आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 2020-21 या वर्षासाठीचे प्रतिष्ठेच्या नारीशक्ती पुरस्कारांनी 29 व्यक्तींना सन्मानित करणार आहेत.
आज हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडणार असून या पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा समावेश आहे.यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय वनिता बोराडे यांचा देखील समावेश आहे. यांना देशातील पहिल्या महिला सर्पमित्र म्हणून सन्मानित करण्यात आले. वनिता बोराडे या सापांच्या प्रजाती वाचविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अथक काम करत आहेत. त्या महाराष्ट्रातील पहिला महिला सर्पमित्र परिसरातील अनेक लोक विशेषतः पावसाळ्यामध्ये बाहेर पडणाऱ्या सापडला पकडण्यासाठी वनिता यांना फोन करतात. आतापर्यंत त्यांनी मोठे मोठे साप तसेच विषारी सापांच्या अनेक प्रजाती पकडून त्यांना जंगलात सोडून दिले आहे.
याबाबतीत वनिता बोराडे म्हणतात की,जर कुणाला आसपास साप दिसला तर त्यांना मारू नका त्याऐवजी मला फोन करून सांगा.साप हा वातावरणाचा आणि बायो सर्कलचा खूप महत्त्वाचा भाग आहे असे त्यांचे मत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे या बायो सर्कलला त्रास होऊ शकतो. त्यांनी जगा आणि जगू द्या च्या धर्तीवर काम करताना अनेक सापांना नवसंजीवनी दिली आहे. त्यांना ह्या कामाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या कार्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश
सापांना पकडून त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे.
शाळा-कॉलेजमध्ये तरुणांमध्ये सापांविषयी जागृत करण्यासाठी व त्यांना शिक्षित करण्यासाठी ते कार्यशाळा देखील घेतात. ग्रामीण भागामध्ये त्यांना साप वाली बाई म्हणून ओळखले जाते. डीएडच्या सेकंड इयर कोर्स मध्ये वनिता बोराडे यांचे काम आणि आयुष्याबद्दल सांगण्यात आले आहे. या कामांमध्ये त्यांना त्यांचे पती डी भास्कर व मुलांचे देखील पूर्ण सहकार्य आहे.
Published on: 08 March 2022, 08:30 IST