News

नवी दिल्ली : आधारकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक असते. कोणत्याही शासकीय कामासाठी आधारक कार्ड गरजेचे असते. परंतु या आधारविषयी आपली काही तक्रार असेल किंवा काही समस्या असतील तर त्याचे निवारण केंद्र आपल्याला दिसत नाही.

Updated on 20 July, 2020 7:56 PM IST


नवी दिल्ली : आधारकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक असते. कोणत्याही शासकीय कामासाठी आधारक कार्ड गरजेचे असते. परंतु या आधारविषयी आपली काही तक्रार असेल किंवा काही समस्या असतील तर त्याचे निवारण केंद्र आपल्याला दिसत नाही. अनेकवेळा आधार कार्ड बनवण्यासाठी काय करावे लागते, किंवा कोणते कागदपत्रे लागतात, ई-आधार केंद्र कुठे आहे याची माहिती आपल्याला नसते. आता ही माहिती किंवा आधारविषयी आपली कोणतीही समस्या असेल त्याचे निवारण आता ट्विटरमार्फत होणार आहे.

यूआयडीएआयने आधारशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता ट्विटर सर्व्हिस सुरू केली आहे. यासंबंधातील कोणतीही माहिती आता ट्विटर सर्व्हिसद्वारे मिळू शकते. यूआयडीएआयच्या ट्विटर अकाऊंट @UIDAI आणि @Aadhaar_Care वर ट्वीट करुन तुम्ही आधारशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता. याशिवाय आधार केंद्रांच्या प्रादेशिक कार्यालयाचं अधिकृत ट्विटर हॅण्डलही देण्यात आलं आहे. इथे देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा प्रश्न विचारु शकता.  यूआयडीएआयने आता आपल्या सर्व सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. आधार कार्डावरील नाव बदलणे असो किंवा फोन क्रमांक, किंवा इतर कोणतीही माहिती आता ऑनलाईन मिळवता येऊ शकतात. 1947 या कस्टमर केअर नंबरवरही फोन करुन मदत घेता येईल. याशिवाय help@uidai.gov.in वर ई-मेल पाठवून माहिती मिळवता येईल.


यूआयडीएआय 1 जूनपासून देशभरात आधार अपडेशनचे काम करत आहे. याअंतर्गत लोकेशन आणि बायोमेट्रिक अपडेट केले जात आहेत. आधारच्या निर्देशांनुसार, कोणत्याही अपडेशनमध्ये जर फ्रॅन्चाईजी चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त पैसे वसूल करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. देशभरात आधार अपडेशनसाठी 17 हजारांपेक्षा जास्त केंद्र बनवण्यात आले आहेत.  आधार सेवाने ट्वीट करुन सांगितले की, लवकरच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इतर ठिकाणीही आधार केंद्र सुरू केले जातील.

कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशभरात आधार कार्ड अपडेशनचे काम बंद करण्यात आले होते. याच दरम्यान यूआयडीएआयने आधार फ्रॅन्चाईजी देण्यास सुरुवात केली. यासाठी इच्छुक उमेदवारांना केवळ एक परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावे लागेल. यूआयडीएआयकडून आयोजित एक ऑनलाईन परीक्षा जवळच्या केंद्रात देता येईल. आधार फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागते. जर तुम्हाला आपल्या फ्रॅन्चाईजीचे रुपांतर मान्यताप्राप्त केंद्रात करायचे असेल तर यासाठीही वेगळी नोंदणी करावी लागेल.

English Summary: get answer on twitter related Aadhar card
Published on: 20 July 2020, 07:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)