News

नोकरीच्या शोधार्थ असलेल्या उमेदवारांसाठी एका आनंदाची बातमी हाती आली आहे.एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेडने (AAAL) मॅनेजर, सुपरव्हायझरसह (Supervisor) अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्याव लागणार नाही.

Updated on 14 January, 2021 1:35 PM IST

नोकरीच्या शोधार्थ असलेल्या उमेदवारांसाठी एका आनंदाची बातमी हाती आली आहे.एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेडने (AAAL) मॅनेजर, सुपरव्हायझरसह (Supervisor) अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्याव लागणार नाही.

पण तरीदेखील यामध्ये निवडले जाणारे उमेदवार हे एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी करणार आहेत. यासाठी १५ जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.एअर इंडियाकडून  देण्यात आलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी ग्राऊंड इंस्ट्रक्टर  पासून ते सीनिअर सुपरव्हायझर पर्यंत जागा भरण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणआर नाही. त्याजागी वॉक-इन-इंटरव्ह्यू घेतला जाईल. याच माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाईल.अधिक माहितीनुसार, वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी १५, १६ आणि २१ जानेवारी या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. तर उमेदवार १५ जानेवारीच्या आधी Air India च्या अधिकृत वेबसाईट airindia.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

या नोकरीअंतर्गत चीफ ग्राऊंड इंस्ट्रक्टसाठी १, इंजिनिअरिंग चीफसाठी १, रेव्हन्यू मॅनेजमेंट चीफसाठी १, व्हाईस जनरल मॅनजरसाठी १, एजीएम १, एजीएमच्या SMS साठी १ पद, एजीएम QMS १, सीनिअर मॅनेजर (ट्रेड सेल्स) १, कंपनी सेक्रेटरी १ पद, मॅनेजर (ट्रेड सेल्स) साठी २ पदं, फायनेंशिअल मॅनेजर पदावर १ उमेदवार अशी निवड करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त मार्केटिंग सेक्टरमध्ये १ पद, ऑपरेशन २ पद, ट्रेनिंग २, आयएफएससाठी १ पद, फायनेंस ५ पदं आणि सुपरव्हायझर (IT) साठी १पदावर भरती होणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त पोस्टसाठी उमेदवारांकडे MBA, पोस्ट ग्रॅजुएशन आणि पीजी डिप्लोमाची डिग्री असणं महत्त्वाचं आहे. 

 

English Summary: Get a job in Air India without taking the exam, apply like this
Published on: 14 January 2021, 01:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)