सन 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती व त्याअंतर्गत जे शेतकरी नियमितपणे पिक कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोरोना महामारी मुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे ही योजना रखडली होती.
परंतु आता सत्ता बदल होऊन सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा 50000 प्रोत्साहन अनुदानाची योजना कार्यान्वित केली असून त्याची पहिली यादी जाहीर देखील करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे.
नक्की वाचा:"कृषीमंत्र्यांना ओला आणि सुका दुष्काळ यातील फरक तरी कळतो का!''
ज्या शेतकऱ्यांनी 2017-2020 या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये किमान दोन वर्षे नियमित कर्जाची परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.
यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आला असून यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे लागत असून आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट वर्ग केले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले 90 कोटी 93 लाख रुपयांची प्रोत्साहनपर अनुदानाची मदत
या अनुषंगानेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळाला असून तब्बल 90 कोटी 93 लाख रुपयांची प्रोत्साहन राशि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत म्हणून वर्ग करण्यात आली आहे.
जर आपण नगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या एकूण एक लाख 69 हजार 269 असून त्यापैकी पहिला यादीमध्ये बत्तीस हजार 601 शेतकऱ्यांचा समावेश आहे. 12 ऑक्टोबरला या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून शेतकरी बंधूनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे अशा आशयाच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.
या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणची प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा एकूण पहिल्या यादीतील 31 हजार 920 शेतकऱ्यांना प्रकरणाची रक्कम देण्याचे काम सुरू देखील करण्यात आले आहे.
याबद्दल प्राप्त माहितीनुसार जिल्हा बँकेचे नियमित कर्जदार असलेले 25 हजार 418 कर्जदार आणि प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकरी बांधवांना 90 कोटी 93 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
Published on: 23 October 2022, 03:22 IST