News

कांदा म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो महाराष्ट्रातील पश्चिम भाग अर्थातच पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्राचा नाशिक जिल्हा तर कांद्याच्या उत्पादनासाठी एवढा प्रसिद्ध आहे की त्याला कांद्याचे आगार म्हणूनच संबोधले जाते. नासिक प्रमाणेच पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. या जिल्ह्यात ऊस हे नगदी पीक मुख्य पीक म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उत्पादित करतात, उसानंतर कांदा या नगदी पीक आला पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव विशेष पसंती दर्शवितात.

Updated on 11 February, 2022 9:15 PM IST

कांदा पिकाला नगदी पीक म्हणून ओळखतात, मात्र हा नगदी असूनही बेभरवशाचा ठरत असतो. कांद्याच्या उत्पादनात निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या मनात शंका असते तसेच याच्या बाजारभावात देखील नेहमी चढ-उतार बघायला मिळते. मात्र पुणे जिल्ह्यातून कांदा हा जरी बेभरवशाचा असला तरी शेतकऱ्यांना समाधानी बनवत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र खरीप हंगामातील पावसाळी कांद्याची आवक बघायला मिळत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक आवक बाजारपेठेत नमूद करण्यात येत आहे. सरासरीपेक्षा अधिक आवक  असली तरी बाजार भाव मात्र स्थिर आहेत. साधारणपणे बाजारपेठेत आवक वाढली की कुठल्याही शेतमालाचे बाजारभाव लक्षणीय कमी होतात, मात्र पुणे जिल्ह्यात या उलट घडताना दिसतंय बाजारपेठेत विक्रमी आवक आणि दर मात्र चढेच आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकणच्या महात्मा फुले मार्केटमध्ये सध्या खरिपातील पावसाळी कांदा विक्रीसाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची विशेष लगबग लक्षणीय आहे. महात्मा फुले मार्केटमध्ये गावरान कांद्याची आवक ही रोजाना वाढत आहे. 

मित्रांनो गावरान कांद्याला इतर चायना कांद्यापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये विशेषता गावरान कांद्याची मागणी असते. गावरान कांद्याला नेहमीच चायना कांद्यापेक्षा अधिकचा दर मिळत असतो. यंदाही गावरान कांद्याला मिळत असलेला दर  इतर कांद्यापेक्षा अधिक आहे तसेच सध्या गावरान कांद्याला मिळत असलेल्या आदरामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत. खरं पाहता गावरान कांदा जरी चवीसाठी विशेष प्रचलित असला तरीदेखील या कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र हे खूप कमी आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये आठ हजार पोती कांद्याची आवक नमूद करण्यात आली आहे. गावरान कांद्याला कांदा पाहून म्हणजे दर्जानुसार अठराशे ते 2800 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत असल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावरान कांद्याची आवक बाजारपेठेत होत आहे. सध्या बाजारपेठेत येत असलेला कांदा स्थानिक पातळीवरच विक्री होत आहे. स्थानिक पातळीवर विक्री होत असताना देखील सरासरी दर 2200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत असल्याने भविष्यात जेव्हा कांदा निर्यात सुरू होईल तेव्हा कांद्याच्या बाजारभावात विक्रमी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत केवळ खरिपातील पावसाळी कांदा बघायला मिळत होता मात्र आता गावरान कांद्याने बाजारात इंट्री घेतल्याने बाजारपेठेचे तापमान गरम झाल्याचे बघायला मिळत आहे. कांद्याच्या बाजारभावात भविष्यात बढती होते की नाही हे विशेष बघण्यासारखे असणारे आहे.

English Summary: gavthi onion getting more rate and is in demand also
Published on: 11 February 2022, 09:15 IST