Gas Rate News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (दि.१) रोजी केंद्र सरकारने LPG सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आजपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला असून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली. नवीन दर आजपासूनच लागू होणार आहेत.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या असून काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅसच्या दरात कपात करण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, दिल्ली ते पाटणापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत किंचित घट झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती केवळ १.५ रुपयांनी कमी झाल्या आहेत.
नवीन दरानुसार मुंबईत १७१० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७०८.५० रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत किरकोळ बदल झाला आहे. फक्त १.५० रुपयांनी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे सामान्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही.
एलपीजी गॅसच्या दरात १.५० रुपयांनी कपात
नववर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक गॅसच्या दरात १.५० रुपयांनी कपात केली आहे. हे दर आजपासुन म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. तर याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार नाही. घरगुती सिंलेडर जुन्या दरानेच सर्वांना मिळणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.
घरगुती ग्राहकांना दिलासा नाही
१४ किलो असणाऱ्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कंपन्यांनी कोणतेही बदल केले नाहीत. यामुळे जुन्या दरानेच सर्वसामान्यांना गॅसची खरेदी करावी लागणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ३० ऑगस्ट २०२३ रोजी २०० रुपये कपात केली होती. त्यामुळे दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर ९०३ रुपये, कोलकाता ९२९ रुपये, मुंबई ९०२.५० रुपये तर चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये दराने मिळत आहे.
Published on: 01 January 2024, 06:23 IST