सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल असो की डिझेल, साखर असो की खाद्यतेल त्यातच गॅस सिलेंडर म्हणजे सर्वसामान्य माणसाची सुखाने जगण्याची कल्पनाच हिरावून नेण्यासारखी ही महागाई आहे.
आता गॅस सिलेंडरच्याघरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्यासिलेंडर म्हणजे तब्बल पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे आता नवीनवाढलेल्या किमती नुसारगॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 949.50रुपये द्यावे लागणार आहे.5 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 349 तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2003.50 रुपये झाली आहे.गेल्या सहा ऑक्टोबर रोजीगॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले होते.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील वाढ
पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने 22मार्च म्हणजेच आज पासून सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरात 85 पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 137 दिवसानंतर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेट्रोल 110 रुपये 14 पैसे लिटर वरून 110 रुपये 99 पैसे लिटर तर डिझेल 94 रुपये 30 पैसे प्रति लिटर वरून 95 रुपये 16 पैशांवर आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून आठवडा पूर्ण होत नाही तोपर्यंत केंद्रानेही इंधन दरवाढ लागू केली आहे.
त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलची संबंधित व्यवसायांवर देखील याचा परिणाम होणार असून ट्रान्सपोर्ट सारख्या व्यवसाय देखील आता महागणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर याचा परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तू देखील महाग होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे.
Published on: 22 March 2022, 10:15 IST