News

सर्वांचे लक्ष लागलेला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Updated on 01 February, 2022 5:35 PM IST

सर्वांचे लक्ष लागलेला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यामुळे आता काहीसा दिलासा मिळाला आहे. तर, घरगुती कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा दर 899.50 रुपये आहे. तर, मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरचा दरही 899.50 रुपये इतका आहे.

पाच राज्यांच्या निवडणुका पाहता गॅसच्या दरात वाढ होणार नसल्याची शक्यता होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे आणि गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, इंधन कंपन्यांनी कोणतीही दरवाढ केली नाही. याआधी 6 ऑक्टोबर रोजी गॅसची दरवाढ करण्यात आली होती. तसेच शेती संबंधित देखील अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतमालावर प्रकिया क्षेत्राला प्रोस्तासहन देणार. देशांतर्गत तेल बियाणं उत्पादन वाढवणार. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार. आधुनिक काळातील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल.

रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला देशभर चालना दिली जाईल. कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पासाठी मोठी मदत केली जाणार आहे. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी, जमिनीच्या नोंदी, फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच नैसर्गिक शेतीसाठी चालना देण्यात येणार आहे. देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, तसेच, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात येणार आहे.

शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल. याचबरोबर, जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून गहू आणि धानाची विक्रमी खरेदी केली जाणार आहे. किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी केली जाणर आहे. तरुण शेतकऱ्यांना अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाणार आहेत. कृषी उपकरणे स्वस्त करण्यात आली आहेत.

English Summary: Gas Cylindercha Priced Mothi Kapat, Central Economic ResolutionHalf Mothi Announcement..
Published on: 01 February 2022, 05:35 IST