श्रीगोंदा : तालुक्यातील कामठी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक 18 जून रोजी पार पडली. या निवडणूकीत महाकालिका जनसेवा पॅनलने बहुमत मिळवले. याच बहुमताच्या जोरावर गणेश रावसाहेब आरडे यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली. तर मोहन किसन शिंदे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली.
चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले आणि नगरसेवक यांनी पाईपलाईन रोड येथे चेअरमन गणेश आरडे यांचा सत्कार केला.
शांत स्वभाव आणि मितभाषी असणाऱ्या गणेश आरडे यांना निवडणूकीत सर्वांधिक मते मिळाली. महाकालिका जनसेवा पॅनलचे 9 उमेदवार विजयी झाले. यामध्ये गणेश रावसाहेब आरडे, प्रविण बबन आरडे, विलास श्रीपती आरडे, दादा राजाराम शिंदे, मोहन किसन शिंदे, शिवाजी संभू शिंदे, मारुती कचरू केदारे, दत्तात्रय रामदास मोटे, सौ. कुंदा संदीप शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला.
हे ही वाचा: IMD Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ! 'या' भागात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
चेअरमन पदी निवड झाल्यानंतर गणेश आरडे म्हणाले, आज पर्यंत पडद्या मागे राहून राजकारण केले. पण यावेळी स्वतः रिगंणात उतरायचे ठरवले. आणि याच कामठी गावात मी माझ्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक लढलो. स्वतः ला अजमवण्यासाठी मी ही निवडणूक लढलो.
सोसायटीच्या निवडणूकीत सर्वाधिक लोकांनी मला पसंती दिली. सर्वांत जास्त मते मिळाली. आणखी पुढे एक पाऊल यश मिळाले ते म्हणजे सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाली.
हे ही वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..
सर्वांधिक मते मिळाली पण आता जबाबदारी देखील वाढली आहे. जबाबदारीची जाणिव ठेवून मी काम करीन. संस्थेच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. सर्व संचालकांचे, मतदारांचे मनपूर्वक आभार !!
हे ही वाचा: कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Published on: 13 July 2022, 10:57 IST