News

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वायदे बाजारामध्ये सोयाबीन व्यवहारांवर बंदी घातल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळणार अशी एक शक्यता होती किंवा त्या प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु केंद्र मंत्रालयाची या निर्णयाचा देखील सोयाबीनचे बाजार भाववर कुठलाही परिणाम पाहायला मिळाला नाही, शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे.

Updated on 24 December, 2021 8:24 PM IST

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वायदे बाजारामध्ये सोयाबीन व्यवहारांवर बंदी घातल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळणार अशी एक शक्यता होती किंवा त्या  प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु केंद्र मंत्रालयाची या निर्णयाचा देखील सोयाबीनचे बाजार भाववर कुठलाही परिणाम पाहायला मिळाला नाही, शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे.

सोयाबीनचे वायदे बंदीनंतर ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये जसे की अकोला बाजार समिती चा विचार केला तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारी सोयाबीन ला सहा हजार दोनशे ते सहा हजार 400 रुपयांपर्यंत सर्वसामान्य दर मिळाला. दोन दिवस आधी केंद्रीय मंत्रालयाने सोयाबीन, सोया तेल,क्रूड पाम तेल, हरभरा, मुग आणि सरकी  च्या वायदेबाजार बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत माल विकणे  हा पर्याय शिल्लक होता

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी कोंडीत पकडले गेल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेती क्षेत्रातील तज्ज्ञांकडून रोष व्यक्त करण्यात आला. मात्र या निर्णयाला दोन दिवस झाल्यानंतर ही बाजार समिती सोयाबीनचे दर चांगले आहेत.

 केंद्र सरकारचा वायदा बाजारातील व्यवहारात बंदी घालणारा निर्णय जाहीर केल्यानंतर गुरुवारी बाजार समितीचे सोयाबीनचे दर दोनशे रुपयांनी वाढले. 

बुधवारी सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे विकले गेलेले सोयाबीन गुरुवारी 6400 पर्यंत पोहोचले. बाजार समित्यांमध्ये सीड्स सोयाबीन च्या दरांवर परिणाम दिसून येत नाही. प्रक्रिया उद्योगाकडून लागणे असल्याने गुरुवारी स्वीट सोयाबीनला सहा हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

English Summary: future ban and soyabioen market rate is depend on eachother know market condition
Published on: 24 December 2021, 08:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)