News

नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत गारपीट, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने नऊ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

Updated on 11 March, 2021 6:52 PM IST

नांदेड  जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत गारपीट, अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने नऊ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

हा निधी सहा तालुक्याला वितरित करण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे – २०२० या कालावधीमध्ये गारपीट तसेच अवेळी पाऊस झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळी शेतीपिकांसह बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाद्वारे शासनाला कळवला होता.

 

यात फेब्रुवारी व मार्च २०२० या कालावधीत नुकसान झालेल्यांना सात कोटी १५ लाख चार हजार ४९०, एप्रिलमध्ये नुकसान झालेल्यांना दोन कोटी ३२ लाख ६६ हजार ४१० रुपये तर मे २०२० मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार लाख ७६ हजार शंभर रुपये मिळाले.दरम्यान, हा निधी संबंधित तालुक्यांना वितरित करण्यात आला. हा निधी तालुका स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली.

 

तालुकानिहाय प्राप्त निधी

नांदेड तालुक्यासाठी २१,६०० रुपये, कंधार तालुक्यासाठी २१ कोटी ४५ लाख ६०० रुपये, लोहा तालुक्यासाठी एक कोटी साठ लाख ७४० रुपये, बिलोली एक कोटी ६३ लाख ५० रुपये, मुखेड एक लाख ८५ हजार ७६० रुपये, हदगाव सात कोटी २५ लाख ४३ हजार ७५० रुपये, माहूर साडेचार हजार असा एकूण नऊ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

English Summary: Fund of Rs. 97,000 for untimely rain victims in Nanded district
Published on: 26 February 2021, 03:55 IST