शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. असे असताना आता सरकारकडून त्यांना मदत मिळणार आहे. फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या कालावधीत गारपीट झाली होती. जून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये शेती (Agriculture) पिकलेली होती. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले होते.
यानंतर मोठी गारपीट झाली होती. नुकसान झालेल्या 10 जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकरी अध्यक्षतेतील शेतकऱ्यांकरिता बागा व वार्षिक पिकांसाठी 25000 रुपये प्रति हेक्टर अशा प्रमाणामध्ये मदत वितरीत करण्यासाठी निधी (Fund) वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 33% नुकसानीसाठी जिरायत आणि आश्वासन सिंचन (Irrigation) क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर ठरले होते.
तसेच बहुवार्षिक पिकांच्या (Crop) नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्या अंतर्गत 33.64 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकांच्या कामासाठी हातभार लागणार आहे. जिल्हानिहाय निधी यासाठी देण्यात आला आहे.
दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, शेतकऱ्यांनो कष्टाचा घ्या मोबदला, वाचा सविस्तर..
यामध्ये पुणे विभागासाठी 25 कोटी 26 लाख रुपये. अमरावती विभागासाठी 83 लाख रुपये. औरंगाबाद विभागासाठी 36 लाख. याप्रमाणे एकूण 33 कोटी 64 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. नाशिक विभागासाठी 7 कोटी 18 लाख रुपये. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या खरिपाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ही मागणी केली आजच्या होती.
महत्वाच्या बातम्या;
आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...
ब्रेकिंग! रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती
आता मोदींच्या २ हजारासाठी चुकीची माहिती दिली असेल तर होणार शिक्षा, जाणून घ्या..
Published on: 20 July 2022, 04:29 IST