एलईडीच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीवर पूर्णतः प्रतिबंध घालणार - मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर

03 July 2018 07:11 PM

मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बंदी असलेल्या जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारीला अटकाव करण्यासह एलईडी लाईट्सच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीला पूर्णतः प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग तसेच तट रक्षक दलाच्या समन्वयाने नियमितपणे कारवाई करण्यात येईल, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज सांगितले.

श्री. जानकर यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार राज पुरोहित, मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, उपसचिव विजय चौधरी, सहआयुक्त राजेंद्र जाधव, श्री. नाईक, मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले, एलईडी लाईटच्या सहाय्याने मासेमारी ही मत्स्यसाठ्यावर गंभीर परिणाम करणारी असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. शासनाने कायदेशीररित्या कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मच्छिमारांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

या बैठकीत एलईडीद्वारे मासेमारी, पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी, मत्स्यदुष्काळ, मच्छिमारांना डिझेल प्रतिपूर्ती, मच्छिमार बंदरांचा तसेच कोळीवाड्यांचे सीमांकन आणि विकास, मासे विक्रीवरील जीएसटी आदींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

English Summary: Fully Prohibit fishing with the help of LED : Fishery Minister GOM Mahadev Jankar

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.