कोकण पट्ट्यात सोमवारी संध्याकाळच्या वेळीअचानक पावसाने हजेरी लावली.आलेल्या पावसानेशेतकरांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती येथील फळ बागायतदारामध्ये निर्माण झाली आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने मोहरातअसलेला आंबा पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.
या अवकाळी पावसाचा फटका हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. त्या सोबतच काजू देखील खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पूर्वेकडील भागातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.या अंदाजानुसार कोकण आणि गोव्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली आहे.
मागील काही दिवसांपासून कोकणात वातावरणात अचानक बदल होत असून अवकाळी पाऊस,तसेच कडकडीत थंडी आणि ढगाळ वातावरणाची स्थिती पाहायला मिळत आहे.
मोहर आणि कणी सेटिंग च्या कालावधीत हापूसच्या कलमांना स्वच्छ वातावरणाची आवश्यकता असते. तरस हापूस आंब्याचे उत्पादन चांगले येते. परंतु यावर्षी स्वच्छ हवामान कमी झाल्याचे चित्र दरवेळी अनुभवायला मिळत आहे. तापमान जर 9 अंशापर्यंत घसरले तर पौष महिन्यात अनेक हापूसच्या कलमांना मोहोर आला आहे. झाडांच्या 99% टाळ्यांना मोहर फुटल्यामुळे पानेकमी मोहर अधिक अशी स्थिती बहुसंख्य हापूस बागांमध्ये दिसत आहे.यंदा हंगामाची सुरुवात होत असतानाच चांगली फूट झाली होती. बागायतदारांनी ऑक्टोबर महिन्यात फवारणी केल्यामुळे कणी सेटिंग हे चांगले होत होते.
परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने कणी गळून गेली. कोकणातील बहुतांश शेतकरी हे आंबा आणि काजू बागायतीवर आपला उदरनिर्वाह करतात. परंतु वातावरणामध्ये होत असलेल्या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या कायमच्या वातावरण बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
Published on: 19 January 2022, 02:35 IST