News

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आले असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जळकोट( लातूर ) तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, पर्यवेक्षक विशाल इंगळे यांनी केले आहे. त्याचबरोबर पवार यांनी माहिती देताना सांगितले की, नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजना ही चालू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Updated on 24 June, 2021 1:47 PM IST

 तालुक्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे

  • जमिनीचा सातबारा उतारा व आठ अ उतारा ( एकूण क्षेत्र हे दोन हेक्‍टरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे )
  • आधार कार्ड
  • राष्ट्रीय  बँकेचे बँक पासबुक
  • जॉब कार्ड
  • ग्रामपंचायत ठराव आवश्यक आहे

सलग फळबाग लागवड करण्यासाठी एक हेक्टर क्षेत्राला खालील प्रमाणे अनुदान मिळेल

 1-आंबा कलमे – अनुदान दोन लाख 19 हजार 634

2- चिकू कलम – अनुदान एक लाख 58 हजार 890

3- पेरू कलमे – अनुदान दोन लाख 22 हजार 665

4- डाळिंब कलमे – अनुदान दोन लाख 43 हजार 135

  • लिंबू, संत्रा, मोसंबी – अनुदान एक लाख 48 हजार 873
  • सिताफळ कलम- अनुदान एक लाख 38 हजार 542

बांधावरील फळबाग लागवड एक हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना खालील प्रमाणे अनुदान मिळेल

  • आंबा कलम- अनुदान बत्तीस हजार 252
  • नारळ रोपे – अनुदान 21 हजार 442
  • पेरू कलमे – अनुदान दहा हजार 182
  • सीताफळ कलमे – अनुदान 6888
  • जांभूळ कलमे ( अनुदान 19,220
  • तसेच नाडेप खत उत्पादन युनिटसाठी एकूण अनुदान 15500 तर गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520 वरील प्रमाणे योजना चालू आहे.

 या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे.

 माहिती स्त्रोत – सकाळ

English Summary: fruit crop scheme
Published on: 24 June 2021, 01:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)