उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे त्यामुळे विजेची मागणी अव्वाच्या सव्वा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगचा चटका ग्राहकांना बसणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये आजपासून लोडशेडिंग होणार आहे राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेश मध्ये रोज दोन तास याप्रमाणे लोडशेडिंग केले जाणार आहे.
नक्की वाचा:थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; थेट कारखानाच केला बंद
त्यामुळे या निर्णयाने तीन कोटी ग्राहक प्रभावी होणार आहे. एमएसईडीसीएल ने ही लोडशेडिंग जाहीर केली आहे. या मधून मुंबईला वगळण्यात आले आहे. जर राज्यातील वीज मागणी आणि तिचा पुरवठा याचा विचार केला तर सध्या अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी सहा ते दहा या काळामध्ये जपून वापरण्याचे आवाहन एमएसईडीसीएलने केले आहे. विजेची मागणी ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणामध्ये कोळशाचा देशांतर्गत पुरवठा अत्यल्प होत आहे. त्यामुळे ही लोडशेडिंग केली जात आहे.
याबाबतीत महावितरणचे एका प्रवक्त्याने म्हटले की, विजेची वाढती मागणी ची गरज पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2500 ते 3000 मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोड शेडींग करण्यात येत आहे. आमच्याकडे आता कोणत्याही प्रकारचा पर्याय शिल्लक राहिला नसूनग्राहकांनीसहकार्य करावे.
कोळशाचा साठा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्याचा सरळ परिणाम हा वीजनिर्मिती मध्ये होत असून त्यामध्ये घट आली आहे.
त्यामुळे भारनियमन केल्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली. वरून उन्हाळ्यामुळे घरांमध्ये पंखे, एअर कंडिशनर तसेच फ्रीज कुलर यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या अनुषंगाने विजेचा वापर देखील वाढला असल्याने कोळसा टंचाईमुळे पुरवठा कमी होत आहे त्यामुळे ही लोडशेडिंग केली जात आहे.
Published on: 12 April 2022, 07:33 IST