News

देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्व सेवा बंद करण्यात आल्या होत्या.

Updated on 20 August, 2020 2:50 PM IST


देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्व सेवा बंद करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली होती. दरम्यान अनेक दिवसापासून बंद असलेली लालपरीची सेवा आता परत सुरू होणार आहे.

दोन दिवसांवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला अंतरजिल्हा प्रवाशी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामन्य जनतेला दिलासा मिळाला आहे. हा निर्णय गुरुवारपासून अंमलात येणार आहे. लॉकडाऊन उठविल्यानंतर राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरु केल्या होत्या. मात्र सार्वजनिक वाहतूक सुरू न केल्याने त्याविरोधात गेल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलन केले होते. कोरोनामुळे २२ मार्चपासून एसटी बससेवा बंद होती.

त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्तन्न बुडाल्यने कर्मचाऱ्यांचे पगार देणेदेखील अशक्य झाले होते. राज्य सरकारने ५०० कोटींचे कर्ज काढून एसटी महामंडळाला पगारासाठी पैसे दिले. ११३ दिवस एसटी बससेवा बंद राहिली त्यामुळे एसटी महामंडळाला २४०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले, अशी माहिती मंत्री परब यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात आणण्याचे काम एसटी महामंडळाने केले.

English Summary: From today, Lalpari will run outside the district
Published on: 20 August 2020, 02:50 IST