आज पासून अनेक अत्यावश्यक गरजेच्या वस्तू महागले असून मागच्या महिन्यात झालेल्या जीएसटी कौन्सिलने जीएसटी दर वाढविण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार तांदूळ, मैदा तसेच दही,लस्सी सारख्या दुग्धजन्य पदार्थ आणि अनेक जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत.
आज पासून कोणत्या वस्तू झाल्या महाग?
1- दुग्धजन्य पदार्थ आणि मैदा- केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदाच दुग्धजन्य पदार्थांचा समावेश जीएसटीचा कक्षेत करण्यात आला.
त्यानुसार टेट्रापॅक केलेले दही, लस्सी तसेच बटरमिल्क वर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि इतकेच नाही तर ब्रँड नसलेले प्री पॅकेज केलेले आणि प्री लेबल केलेले पीठ आणि डाळी वर देखील पाच टक्के जीएसटी लावला जाईल.
नक्की वाचा:आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..
2- एलईडी दिवे आणि एलईडी लॅम्पस- सरकारने कात्री, शार्पनर, ब्लेड, काटे असलेले चमचे, स्कीमर्स आणि केक सर्विस इत्यादींवर जीएसटी वाढविला असून तब्बल 18 टक्के दराने आता जीएसटी वसूल केला जाईल. एवढेच नाही तर एलईडी दिवे आणि लॅम्प यावर देखील जीएसटी बारा टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला.
3- हॉस्पिटलमध्ये उपचार झाले महाग- रुग्णालयाकडून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त प्रती दिन रूम उपलब्ध करून दिल्यास त्यावर पाच टक्के दराने जीएसटी भरावा लागेल. यामध्ये आयसीयू, आय सी सी यु आणि एन आय सी यु रूमवर सूट लागू असेल.
नक्की वाचा:उद्यापासुन महागाई रडवणार, खाणं-पिणं आणि वैद्यकीय सेवाही महागणार
4- गोदामात माल ठेवणे महाग- गोदामातील ड्रायफ्रूट्स, खोबरे, मसाले, गुळ, कापूस, ताग, तेंदूपत्ता,चहा, कॉफी इत्यादींच्या साठवणुकीच्या सेवा आतापर्यंत करमुक्त होत्या त्या आता जीएसटी या कक्षेत आणण्यात आले आहेत.
आता यावर 12 टक्के दराने जीएसटी आकारला जाणार आहे.
5- हॉटेलच्या रुम महाग- आतापर्यंत एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता. परंतु आता अशा खोल्यांवर 12 टक्के दराने जीएसटी लागू होईल.
Published on: 18 July 2022, 01:57 IST