केंद्र सरकार सातत्याने विविध गोष्टींमध्ये नाविन्यपूर्ण बदल करत असून त्याचा सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत आहे. आपल्याला माहित आहेच की पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला पोहोचले असल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो. तसेच भविष्य काळामध्ये इंधनाची कमतरता जाणवण्याची देखील शक्यता असल्यामुळे या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या उपायोजना सरकार मार्फत करण्यात येतात.
त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या वर्षापासून गाड्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल वर धावतील व त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल आत्मनिर्भर होण्याकडे होईलच परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना देखील मिळेल, या दृष्टिकोनातून या इंधनावर जोर देण्यात येणार आहे.
पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली माहिती
याबाबतची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी दिली. त्यांनी सांगितले की येणाऱ्या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून देशातील काही निवडक पेट्रोलपंपांवर 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पुरवठा करण्यात येईल.
त्यासोबतच या निर्णयाचे अनेक सकारात्मक दूरगामी परिणाम देखील पाहायला मिळतील. पुरी यांनी सांगितले की हे पेट्रोल 2023 पासून बरेच ठिकाणी उपलब्ध करण्यात येईल तसेच उरलेल्या ठिकाणी 2025 पर्यंत त्याचा समावेश करण्यात येईल.
तसेच राष्ट्रीय जैवइंधन धोरणांतर्गत सुधारित उद्दिष्टे अंतर्गत सरकारने 2025-26 पर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले असून अगोदर जे काही पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले होते ते वेळेपूर्वी पूर्ण केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सांगितले की, दहा टक्के इथेनॉल मिश्रण पेट्रोल च्या माध्यमातून 41 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक परकीय चलन वाचविण्यात यश आले असून शेतकऱ्यांना 40 हजार 600 कोटींचा देखील फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोलमध्ये जर 20 टक्के इथेनॉल मिसळायचे असेल तर जवळजवळ एक हजार कोटी लिटर इथेनॉल ची गरज पडणार आहे.
नक्की वाचा:हे बंध रेशमाचे! रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा; जाणून घ्या रक्षाबंधनाचा इतिहास
Published on: 11 August 2022, 12:14 IST