News

जर शेतकर्‍यांनी परंपरागत शेती सोडून तंत्रज्ञानाला धरून जर शेती केली तर त्यांना चांगले उत्पादन आणि नफा मिळू शकतो. यामध्ये कारल्याची शेती निकर भाजीपाला पिकांपेक्षा अधिक फायदेशीर होऊ शकते. जेव्हा अन्य भाजीपाल्यांचे भाव फार कमी असतात, तेव्हा कारल्याचे भाव 25 ते 30 रुपये किलो असतात.

Updated on 24 February, 2021 4:00 PM IST

जर शेतकर्‍यांनी परंपरागत शेती सोडून तंत्रज्ञानाला धरून जर शेती केली तर त्यांना चांगले उत्पादन आणि नफा मिळू शकतो. यामध्ये कारल्याची शेती निकर भाजीपाला पिकांपेक्षा अधिक फायदेशीर होऊ शकते. जेव्हा अन्य भाजीपाल्यांचे भाव फार कमी असतात,  तेव्हा कारल्याचे भाव 25 ते 30 रुपये किलो असतात.

त्यामुळे आता बरेच शेतकरी हे कारल्याच्या शेतीकडे वळले आहेत.  या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका हरियाणा राज्यातील दुल्हे डा गावचे रमेशकुमार जे कारल्याच्या शेतातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत त्याबद्दल माहिती देणार आहोत.

  दोन हंगामात करतात कारल्याची शेती

 प्रगत शेतकरी रमेश कुमार यांनी कृषी जागरण जागरण सोबत बोलताना सांगितले की, ते मागील दोन वर्षापासून कारल्याची शेती करत आहेत. एका एकरामध्ये त्यांनी कारल्याची लागवड केली आहे. ते दोन हंगामामध्ये कारल्याची लागवड करतात. पहिला हंगाम म्हणजे जून-जुलैमध्ये ते कारल्याची लागवड करतात त्यापासून त्यांना डिसेंबर पर्यंत उत्पादन मिळते.  नंतरशेतीची चांगली मशागत करून जानेवारी फेब्रुवारी मध्ये परत कारल्याची लागवड करतात, त्यामधून त्यांना मे ते जून पर्यंत चांगले उत्पादन मिळते.

 

प्रति एकर लावतात आठ हजार रोपे

  त्यांनी सांगितले की ते प्रख्यात अशा खाजगी कंपन्यांचे कारल्याचे हायब्रीड व्हरायटी लावतात. शेतीची चांगली मशागत केल्यानंतर ते उत्तम प्रतीचे बेड  बनवतात.  तसेच कारल्याच्या शेतीसाठी ते मल्चिंग पेपरचा वापर तसेच सिंचनासाठी ड्रिप एरीकेशन चा वापर करतात. कारल्याच्या वेलांना सुतळीने बांधून सपोर्टला बांधलेल्या बांबूवर चढवतात. तसेच खतांमध्ये ते एका एकरासाठी एक डीएपी ची 50 किलोची बॅग, पाच किलो झिंक आणि तीन किलो सल्फर देतात. जवळजवळ एक एकर क्षेत्रा मध्ये आठ हजार रोपे लागतात.

 

एका हंगामात दोन लाखाची कमाई

 त्यांच्या उत्पादनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, एक एकर कारल्याच्या शेतीसाठी त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. परंतु चांगले उत्पादन मिळाल्यानंतर त्यांना कमीत कमी एका हंगामात दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. त्यांच्या उत्पादित माल झज्जर तसेच आसपासच्या भाजीपाला मार्केट मध्ये विकतात. ज्याचे त्यांना ठोक विक्री मध्ये किलोला 25 ते 30 रुपये भाव मिळतो.

 नाव- रमेश कुमार

 मोबाईल नंबर-9466511407

English Summary: From bitter guard farm earns two lakh rupees every season
Published on: 20 February 2021, 06:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)