व्यवसाय- युवा प्रगतिशील शेतकरी (शेती ला अनुसरून पाच जोड व्यवसाय)
शेती विषयक कार्य-कृषी जिवन जैविक शेती समुह व सेंद्रिय शेती समुह या माध्यमातून इंदौर ला जैविक शेती मधे प्रशिक्षण व रामेती व वनामती नागपूर ला सेंद्रिय शेती मध्ये प्रशिक्षण घेऊन कृषी विभाग व NGOच्या माध्यमातून शेतकऱ्याचें प्रशिक्षण घेतले व महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्र सोबत जुळून सेंद्रिय शेती बाबत वेबिनार घेतले त्याच बरोबर शेतकरी यांच्या सोबत चर्चा व वेळोवेळी मार्गदर्शन केले
व जैविक बियाणे प्रक्रिया बाबत माहिती व सरी वरंबा पद्धत, पट्टा पद्धतीने सरासरी च्या दुपट्ट पिकं उत्पादन घेऊन एक तालुका स्तरावर बहुमान पटकावला.
हे ही वाचा इथे सेंद्रिय शेतीसाठी देशी गायींच्या संगोपनासाठी दिले जाणार दरमहा ९०० रुपये
तसेच कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेला कार्यक्रम जसे बिजोत्पादन, पिकं स्पर्धा, शेती शाळा,शेतकरी सहल, सतत सोशल मीडिया माध्यमाच्या आधारे शेती विषयक लेख तयार करून स्वताची ओळख निर्माण केली.व्हाट्स अॅप च्या माध्यमातून दहा हजार शेतकरी यांच्या सोबत
शेती विषय जनजागृती चे काम केले.तसेच काही शेतकरी यांना सोबत घेऊन महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील प्रगतिशील शेतकरी यांची भेट व मार्गदर्शन घेतले.कापुस उत्पादक शेतकरी श्री अमृतराव देशमुख यवतमाळ यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच तुर उत्पादन शेतकरी हटवार चिखली बुलढाना यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतलेली तुर चे रहस्य समजून घेतले.त्याच बरोबर मध्यप्रदेश मधे जाऊन सेंद्रिय शेती चे प्रशिक्षण शेतकरी यांना समजावून सांगितले. मध्य प्रदेश मधे गहु उत्पादक शेतकरी यांच्या सोबत संवाद साधत मार्गदर्शन घेतले.
कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेला कार्यक्रम जसे बिजोत्पादन, पिकं स्पर्धा, शेती शाळा,शेतकरी सहल, सतत सोशल मीडिया माध्यमाच्या आधारे शेती विषयक लेख तयार करून स्वताची ओळख निर्माण केली.
तसेच प्रयोग शेती मधे राबविले या साठी कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
मिलिंद जि गोदे
9423361185
milindgode111@gmail.com
Published on: 26 April 2022, 10:04 IST