News

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडवले होते. असे असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने किमती कमी करून काहीसा दिलासा दिला आहे. आता मात्र याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

Updated on 27 May, 2022 5:06 PM IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडवले होते. असे असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने किमती कमी करून काहीसा दिलासा दिला आहे. आता मात्र याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता 31 मे हा दिवस आणखी आव्हाने घेऊन येणार आहे. या दिवशी पेट्रोल पंप डीलर संपावर जाणार आहेत.

यामुळे अनेकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कमीशन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. यामुळे आताच गाडीत पेट्रोल आहे का नाही ते चेक करा. या दिवशी इंधन खरेदी पूर्णपणे बंद असणार आहे.

यामुळे या दिवशी पेट्रोल पंपावर खडखडाटही असू शकतो. काहीजण मात्र या संपाचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगत आहेत. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले असतानाच पंप चालक- मालकांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या निर्णयामुळे या मंडळींचे मोठं नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आली.

सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा! पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार, आता मिळणार ४ लाख..

यामुळे याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभरात 31 मे या दिवशी कोणत्याही प्रकारची इंधन खरेदी न करता संपाची हाक देण्यात आली आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संप असणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
आता कोल्हापूर सांगलीत पूर येणार नाही, अलमट्टी धरणाबाबत झाली महत्वपूर्ण बैठक
एकीचे बळ! मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख, आता झाले बागायती

English Summary: Friends, fill your car tank today! There will be a bang at the petrol pump ...
Published on: 27 May 2022, 05:06 IST