सध्या राज्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटेने नुसता हाहाकार माजवला होता. परंतु आता काही दिवसानंतर ही दुसरी लाट हळूहळू ओसरायला लागली आहे. त्यातच राज्यात कोरोना ची तिसरी लाट येईल असा अंदाज अनेक तज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
दुसऱ्या लाटेत आपण पाहिले की, ग्रामीण भागात कोरोनाचे दुसरी लाट जास्त प्रमाणात पसरली होती. त्यामुळे ग्रामीण भाग कोरोना मुक्त होण्यासाठी खास स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोरोना मुक्त गाव करणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लाखांचा निधी दिली जाणार आहे.
गावातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरणा मुक्त व्हावेत यासाठी कोरोना मुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी जनतेशी संवाद साधला त्यादिवशी त्यांनी गावाच्या वेशीवरच कोणाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस वितरित करण्यात येईल महाराष्ट्रात असलेल्या सहा महसूल विभागात प्रत्येकी तीन प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षिसेही दिली जाणार आहेत.
याशिवाय कोरोना मुक्त गाव स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष 25 15 व 30 54 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींन अनुक्रमे 50 लाख रुपये 25 लाख रुपये आणि पंधरा लाख रुपय इतक्या निधीची विकास कामे मंजूर केले जाणार आहेत. सदर स्पर्धेत जे गावे सहभागी होतील त्या गावांचे 22 निकषांवर गुणांकन केले जाणार आहे.
यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोना मुक्त करावे असे आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
Published on: 03 June 2021, 07:02 IST