गाव कोरोनामुक्त करा जिंका 50 लाख, ठाकरे सरकारकडून स्पर्धेची घोषणा

03 June 2021 06:52 PM By: KJ Maharashtra
गावातून घालवा कोरोना, मिळेल पैश्याचं बक्षिस

गावातून घालवा कोरोना, मिळेल पैश्याचं बक्षिस

सध्या राज्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटेने नुसता हाहाकार माजवला होता. परंतु आता काही दिवसानंतर ही दुसरी लाट हळूहळू ओसरायला  लागली आहे. त्यातच राज्यात कोरोना  ची तिसरी लाट येईल असा अंदाज अनेक तज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या लाटेत आपण पाहिले की, ग्रामीण भागात कोरोनाचे दुसरी लाट जास्त प्रमाणात पसरली होती. त्यामुळे ग्रामीण भाग कोरोना मुक्त होण्यासाठी खास स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोरोना मुक्त गाव करणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लाखांचा निधी दिली जाणार आहे.

गावातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरणा मुक्त व्हावेत यासाठी कोरोना मुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी जनतेशी संवाद साधला त्यादिवशी त्यांनी गावाच्या वेशीवरच कोणाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस वितरित करण्यात येईल महाराष्ट्रात असलेल्या सहा महसूल विभागात प्रत्येकी तीन प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षिसेही दिली जाणार आहेत.

 

याशिवाय कोरोना मुक्त गाव स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष 25 15 व 30 54 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींन अनुक्रमे 50 लाख रुपये 25 लाख रुपये आणि पंधरा लाख रुपय इतक्या निधीची विकास कामे मंजूर केले जाणार आहेत. सदर स्पर्धेत जे गावे सहभागी होतील त्या गावांचे 22 निकषांवर गुणांकन  केले जाणार आहे. 

यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या  स्पर्धेत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोना  मुक्त करावे असे आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

गाव कोरोनामुक्त ठाकरे सरकार thackeray government राज्य सरकार state government corona कोरोना
English Summary: Free the village of Corona, win Rs 50 lakh, Thackeray government announces competition

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.