News

राज्यातील स्वत धान्य दुकांनामधून एप्रिल आणि मे सोबत जून महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय १९ मार्च घेतला होता. केंद्र शासनाकडून ३० मार्च २०२० मार्च रोजी एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Updated on 02 April, 2020 6:31 PM IST


राज्यातील स्वत धान्य दुकांनामधून एप्रिल आणि मे सोबत जून महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय १९ मार्च घेतला होता.  केंद्र शासनाकडून ३० मार्च २०२० मार्च रोजी एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रिपणे उपलब्ध करुन दिल्यास शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निर्दशनास आणण्यात आली.  तसेच केंद्र सरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसात धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यामध्ये , त्या महिन्याचे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करुन देण्य़ात येईल. या योजनेचा राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील ४०० व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व रेशन धान्य दुकानदारांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. व सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील २ लाखाहून अधिक शिधापत्रिका धारकांनी नियमित धान्य घेतले आहे. तसेच सर्व रेशन धान्य दुकांनामध्ये आवश्यक धान्य पुरवठा करण्यात येत असून नियमित धान्य खरेदीनंतर शिक्षापत्रिका धारकांना लवकरच मोफत तांदळाचे वाटप केले जाईल. दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत असल्याचेही ते म्हणालेत.

English Summary: free rice antyodya and pradhanya kutumb scheme beneficiaries
Published on: 02 April 2020, 06:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)