कोरोनाच्या संकट काळात मोदी सरकराने गरीब लोकांना पंतप्रधान मंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस सिलिंडर दिले. दरम्यान ही मोफत सिलिंडरची सेवा सप्टेंबर ३० तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे. हाती आलेल्या अहवालानुसार, ही सेवा एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून उज्ज्वला गॅस योजनेची सुरुवात झाली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांना अधिक लाभ मिळवून देण्याचा आहे. जर आपण द्रारिद्य गटात मोडत असाल तर आपण या योजनेसाठी अर्ज करुन मोफत गॅस जोडणी करु शकता. या योजनेची अंतिम मुदत येत्या आठ दिवसात संपणार आहे.
Important Documents for PM Ujjwala Yojana पीएम उज्ज्वला योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे
केवायसी अर्ज हा आपल्या जवळील एलपीजी केंद्रात जमा करावा. नाव, पत्ता, जनधन बँक खाते नंबर, आधार कार्ड आवश्यक असते. बीपीएल कुटुंबातील महिला सदस्य यासाठी अर्ज करू शकतात. शिवाय तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, बीपीएल कार्ड, आधार कार्ड, वयाचा दाखला, बीपीएल यादीतील नाव प्रिंट, बँक पासबुकची छायाचित्र प्रत आणि रेशनकार्डची छायाचित्र प्रत सादर करणे आवश्यक आहे.
Published on: 22 September 2020, 03:33 IST