News

मागील काही महिन्यांमध्ये आंबे येथे महसूल विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये महसूल विभागाच्या वतीने तब्बल २३०० ब्रास वाळूही जप्त करून गुन्हे दाखल केले होते.

Updated on 08 August, 2023 10:21 AM IST

मागील काही महिन्यांमध्ये आंबे येथे महसूल विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये महसूल विभागाच्या वतीने तब्बल २३०० ब्रास वाळूही जप्त करून गुन्हे दाखल केले होते.

असे असताना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टमध्ये महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

या उपक्रमात ‘एक हात मदतीसाठी’ या उपक्रमांतर्गत आंबे येथे मागील काही महिन्यांमध्ये २३०० ब्रास जप्त करण्यात आलेली वाळू आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी मोफत वाटप करण्यास आंबे येथे सुरवात झाली.

शेतमालावर आता ४ तासात कर्ज, राज्य सहकारी बँकेची योजना, आतापर्यंत १०० कोटींचे वाटपही झाले...

दरम्यान, अनेक ठिकाणी वाळू नसल्यामुळे काही घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी प्रतिलाभार्थी पाच ब्रास याप्रमाणे तालुक्यातील नऊशे लाभार्थींना ज्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.

एका एकरात मिळणार 60 लाखांचे उत्पन्न, अशा प्रकारे या फळाची लागवड

त्याच वाहनातून वाळू घरापर्यंत पोच केली जात आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होत आहे. पंढरपूरमध्ये ९१२ घरकुल लाभार्थींनी ४१०० ब्रास वाळूची मागणी केली आहे. ज्या लाभार्थींचे घरकुल बांधकाम सुरू आहे, जे लाभार्थी खरंच घरकुल बांधणार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

FRP वरील रकमेला कर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्राला ८,००० कोटींचा फायदा, फडणवीस यांची माहिती

English Summary: Free distribution of seized sand to households, revenue department's decision..
Published on: 08 August 2023, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)