News

जालना: शेतकऱ्यांना अनेकदा आपल्या मालाला अधिक भाव मिळण्याची अपेक्षा असते. पण बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आता थेट व्यापाऱ्यांना माल विकत आहेत. मात्र थेट व्यापाऱ्यांना माल विकणे शेतकऱ्यांना महागात पडले आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका स्थानिक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

Updated on 06 September, 2022 2:07 PM IST

जालना: शेतकऱ्यांना (Farmers) अनेकदा आपल्या मालाला अधिक भाव मिळण्याची अपेक्षा असते. पण बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आता थेट व्यापाऱ्यांना माल विकत आहेत. मात्र थेट व्यापाऱ्यांना माल विकणे शेतकऱ्यांना महागात पडले आहे. भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका स्थानिक व्यापाऱ्याने (traders) शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) केली आहे.

शेतमालाला (Agricultural goods) जास्त भाव देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याने तेथील शेतकऱ्यांकडून उधारीवर माल घेतला. सोयाबीन, मका, हरभरा, कापूस अशा अनेक पिकांचा माल व्यापाऱ्याने उधारीवर घेत फरार झाला आहे. याप्रकरणी पारध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश रामकिशन बालरावत ( रा.पिंपळगाव रेणुकाई) असे फरार व्यापाऱ्याचे नाव आहे.

दिनेश त्याचे वडील आणि दोन भाऊ हे सर्वजण मिळून गावामध्ये भुसाराचा व्यवसाय करायचे. गावातील लोकांकडून दिनेशने अनेकवेळा माल खरेदी करत थोड्या दिवसांनी त्यांना पैसेही दिले होते. त्यामुळे लोकांचा दिनेशवर विश्वास बसला होता.

वरुणराजाची कृपा! पाण्याविना संकटात असलेल्या पिकांना पावसाची संजीवनी...

यावर्षीही शेतकऱ्यांनी दिनेशला सोयाबीन, कापुस, मका, हरभरा इत्यादी माल विकला आणि शेतकऱ्यांना मालाचे पैसे देण्यासाठी मुदत दिली. मुदत संपल्यानंतरही व्यापारी दिनेशने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी दिनेशच्या घरी गेले.

दिनेशच्या घरी शेतकऱ्यांना धमकी आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. दिनेशने गावातील शेतकऱ्यांना माल घेऊन गावातून ४ महिन्यांपूर्वीच धूम ठोकली आहे. तसेच मोबाईल बंद येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सिंचनासह पैसे कमवण्याची संधी! अनुदानावर सोलर पंप मिळवण्यासाठी येथे करा अर्ज...

शेतकऱ्यांना मालाचे पैसे न मिळाल्यामुळे दुसऱ्यांकडून पैसे उसने घ्यावे लागत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या घरी देखील मालाचे पैसे न मिळाल्यामुळे वाद्य होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या:
LIC च्या या प्लॅनमध्ये तुम्ही 861 रुपये गुंतवल्यास तुम्हाला मिळतील 540000 रुपये
भारतात 10 पैकी 7 जण करतात ही मोठी चूक! जाणून घ्या सीट बेल्टचे एअरबॅगशी काय कनेक्शन आहे?

English Summary: Fraud of crores of farmers, traders absconding with farm produce
Published on: 06 September 2022, 02:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)