पंतप्रधान पिक विमा योजनाही तळागाळापर्यंत पोहोचले असून शेतकऱ्यांना या योजनेची संपूर्ण माहिती झाली आहे.त्यानुषंगाने यावर्षी तब्बल 41 लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेतला.
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी फायदा घेतला ही कौतुकाची बाब असल्याचे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर या योजनेची जनजागृती झाल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग या योजनेत वाढला.
पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांना होत आहे परंतु या वर्षी काही तांत्रिक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशीर झाला होता. शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा रक्कम मिळावी या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मार्फत 2300 कोटी रुपये पिक विमा कंपन्यांना देण्यात आले होते. यामध्ये राज्य सरकारनेही मोठी भूमिका पार पाडली व प्रतिकूल परिस्थितीमध्येही सरकारने मोठ्या प्रमाणात विमा कंपनीला रक्कम अदा केली होती.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 41 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. पावसामुळे झालेल्या नुकसान या प्रमाणात शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. राज्य शासनाने 10 विमा कंपन्यांना दोन हजार 400 कोटी रुपये अदा केले असून त्या प्रमाणात केंद्र सरकारने देखिल विमा कंपन्यांना पैसे अदा केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित नुकसानभरपाईही मिळालेली आहे. (संदर्भ-कृषीक्रांती)
Published on: 24 December 2021, 07:22 IST