News

आपण म्हणतो ना निसर्गाची किमया पुढे कुणाचच काही चालत नाही. केव्हा काय अद्भुत घडेल याचा भरवसा राहत नाही आणि काही गोष्टींचा आपल्याला विश्वास नाही पटत. परंतु अशीच एक अविश्वसनीय घटना भंडारा जिल्ह्यात घडली नेमके काय घडले किंवा काय चमत्कार झाला ते आपण पाहूया.

Updated on 12 October, 2020 5:45 PM IST


आपण म्हणतो ना निसर्गाची किमया पुढे कुणाचच काही चालत नाही. केव्हा काय अद्भुत घडेल याचा भरवसा राहत नाही आणि काही गोष्टींचा आपल्याला विश्वास नाही पटत. परंतु अशीच एक अविश्वसनीय घटना भंडारा जिल्ह्यात घडली नेमके काय घडले किंवा काय चमत्कार झाला त्या पण खाली पाहू.

सध्याच्या काळामध्ये बियाण्यांच्या संशोधन क्षेत्रामध्ये अद्भुत अशी प्रगती होत आहे. नवनवीन बियाणे विकसित केले जात आहेत त्यातच सवयीची एक जात विकसित करण्यात आले आहे, तिचे नाव आहे ब्रिंजल चवळी.  या वाणाची लागवड केल्यानंतर चक्क चार फूट लांबीची चवळीची शेंग वेलाला लागली आहे. भंडारा जिल्ह्यांमध्ये लाखांदूर तालुका आहे या तालुक्यातील सरांडी बुद्रुक येथील मुनेश्वर राऊत यांनी त्यांच्या शेतात हे वाण लावले आहे. त्यांच्या शेतात या शेंगा बहरत आहेत.

त्याचे झाले असे की, मुनेश्वरराऊत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकांकडून ब्रिंजल नावाचे चवळीचे वान आणले होते. पावसाळा सुरू होण्याच्या प्रारंभी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्याची लागवड केली. त्यांनी लागवड केलेल्या एकूण २५ वेली पैकी २३ वेलींना शेंगा आल्या आहेत. पण त्यातील एका वेलीवर चार ते पाच फूट लांबीच्या शेंगा लागलेल्या आहेत. या शेंगांचे वजन दीड किलो एवढे आहे.  दोडक्या सारख्या दिसणाऱ्या शेंगांची भाजी दोडक्या सारखे चविष्ट होते असे ते सांगतात.  परंतु एवढे मोठे शेंगा पाहून परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

English Summary: Four feet long beans in bhandra farm
Published on: 12 October 2020, 05:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)