News

पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोर पकडला असून

Updated on 08 August, 2022 6:55 PM IST

पावसाने मुंबईत पुन्हा एकदा जोर पकडला असून,आता पुढील चार दिवस हवामान खात्याने राज्यालाही रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार,कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याने दिला असून, काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीची शक्यता

असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले.Rains made a strong comeback in most districts of the state on Sunday.कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही श्रावणसरी बरसल्या.

पाऊस का पडणार?मान्सूनचा आस ॲक्टिव्ह असून, सरासरी जागेपासून दक्षिणेकडे शिफ्ट झाल्यामुळे पुढील ४-५ दिवस याच जागेवर स्थिर राहण्याची शक्यता. बंगाल, ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीसमोरील चक्रीय वाऱ्याची स्थिती व त्यातून त्याच ठिकाणी तयार होणाऱ्या अधिक उंचीचे कमी दाब क्षेत्र व त्याचे डिप्रेशनमध्ये

रूपांतर हे क्षेत्र पश्चिम दिशेकडे म्हणजे ओरिसा, झारखंड, छत्तीसगडकडील मध्य प्रदेशपर्यंतच्या भू-भागावर सरकण्याच्या शक्यतेमुळे. अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीसमोर तयार होणारे तटीय कमी दाब क्षेत्र. दक्षिण गोलार्धातील भारतीय समुद्रात मादागास्कर बेटाजवळील हवेचे दाब

क्षेत्र व त्यानिगडित ईशान्येकडे वाहणाऱ्या बळकट वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या दक्षिणेकडील ४-५ राज्यांत पाऊस पडेल, असे हवामान खात्याचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस हवामान बदलाचे

इशारे देण्यात आले आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

कृष्णनंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

English Summary: Four days of heavy rain warning; State red and orange alert, danger of flood
Published on: 08 August 2022, 06:55 IST