News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जलयुक्त शिवार घोटाळा चांगलाच गाजत आहे. आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आता जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी परळी पोलिसांनी आणखी चौघांवर कारवाई केली आहे.

Updated on 15 March, 2022 10:52 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जलयुक्त शिवार घोटाळा चांगलाच गाजत आहे. आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आता जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी परळी पोलिसांनी आणखी चौघांवर कारवाई केली आहे. दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कर्मचार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजपच्या तत्कालीन सरकारची ही महत्वाची योजना होती. यामध्ये भष्ट्राचार झाल्याचे आरोप काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी केले होते. यामुळे अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते या आदेशा सोबतच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरू केली आहे. यामुळे आता यामध्ये अजून कोणाची नावे समोर येणार हे लवकरच समजेल.

आता शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यामध्ये शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत. तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत परळी पोलीस स्टेशनमध्ये दोन कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते. तसेच लगेच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरु केली आहे. 2018 मध्ये जलयुक्त शिवारच्या कामामध्ये घोटाळ झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते.

महत्वाच्या बातम्या: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केळी पिकाला मिळाला फळ दर्जा, आता 'या' योजनांचा मिळणार लाभ
अतिरिक्त ऊस गाळपाची चिंता मिटली, सहकार मंत्र्यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना दिला शब्द..

 

 

English Summary: Four arrested in Jalayukta Shivar scam case, big blow to BJP leaders ..
Published on: 15 March 2022, 10:50 IST