News

सुरुवातीला भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची नावं चर्तेत राहिली. मात्र दिल्लीकरांच्या मनात काही वेगळंच होत. यामुळे दिल्लीतून फोन आल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Updated on 01 July, 2022 10:52 AM IST

राज्यात काल मोठ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लगली, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. अचानक हे सर्व घडल्याने अनेकांना धक्काच बसला. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करत फडणवीसांनी एक (Devendra Fadnavis) मास्टरस्ट्रोक मारला. यामुळे फडणवीस नेमकी काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, अगोदर त्यांनी ते मंत्रीमंडळाच्या बाहेर असतील असे म्हटले गेले, मात्र पुन्हा सगळी सूत्र हलली.

सुरुवातीला भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची नावं चर्तेत राहिली. मात्र दिल्लीकरांच्या मनात काही वेगळंच होत. यामुळे दिल्लीतून फोन आल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये सुरुवातीला त्यातल्यात पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन राज्याला पुन्हा एक सरप्राईज मिळणार का? हाही सवाल विचारला जात होता.

फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना अचानक त्यांनीच शिंदे यांचे नाव जाहीर केले, यामुळे अनेकांना धक्काच बसला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर असताना फडणवीसांचे नाव आल्याने चर्चा सुरु झाली, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हायचं ठरवल्यास इतरांची सधी ही नक्कीच जाणार होती.

डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..

दरम्यान, पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते हे सध्या नाराज आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजी ही उघडपणे आंदोलनं करत दाखवली आहे. काही कार्यकर्त्यांकडून तर आत्मदहनाचाही प्रयत्न झाला आहे. आधी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा ही राज्यसभेसाठी होती. मात्र त्याठिकाणी देखील त्यांना घेतले गेले नाही. यामुळे त्यांना आता तरी संधी मिळेल असे सांगितले जात होते.

महत्वाच्या बातम्या;
आता रांगेत थांबण्याचे टेन्शन मिटणार!! CNG संपल्यावर एका कॉलवर मिळणार टाकी भरून
मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो
शेतकऱ्याच्या मुलाचा जगात गाजावाजा! फेसबुकवर मिळवली करोडोच्या पॅकेजची नोकरी

English Summary: formula moved phone! This name decided before Fadnavis Deputy Chief Minister.
Published on: 01 July 2022, 10:52 IST