अमेरिकेतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.
यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित केले आहे. ट्रम्प यांनी दोषी नसल्याची कबुली दिली. त्यांनी हेराफेरीची ३४ प्रकरणे चुकीची असल्याचे सांगितले. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोर्टातून बाहेर पडले. ट्रम्प काही वेळाने निवेदन जारी करतील.
ट्रम्प येण्यापूर्वी न्यायालयाजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ट्रम्प आठ कारच्या ताफ्यात कोर्टात पोहोचले. गुन्हेगारी खटल्यात खटल्याला सामोरे जाणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असलेल्या ट्रम्प यांनी सोमवारी फ्लोरिडा सोडण्यापूर्वी 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर लिहिले की त्यांचा सतत छळ होत आहे.
महाराष्ट्राचा पहिला नंबर! पण कशात, इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत महाग वीज महाराष्ट्रात..
या प्रकरणामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सर्वात गंभीर आरोप म्हणजे पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे. ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे.
कर्मचारी झाले आता राज्यातील तहसीलदार संपावर
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे.
कृषिपंपांच्या वीज दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना..
सिबिल स्कोअरची अट न लावता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, सरकारचा आदेश बँका पाळणार का?
पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..
Published on: 05 April 2023, 09:47 IST