News

यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीला मोठे उधाण आले आहे. जिल्ह्यातील भांबरजा येथील माजी सरपंच व विद्यमान बाजार समिती संचालकाची निर्घुण हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. 3 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 04 February, 2022 4:15 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीला मोठे उधाण आले आहे. जिल्ह्यातील भांबरजा येथील माजी सरपंच व विद्यमान बाजार समिती संचालकाची निर्घुण हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. 3 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठल्याचे सांगितले जात आहे.

3 जानेवारी रोजी, भांबरजा येथील विद्यमान सरपंचाचे पती व माजी सरपंच तसेच बाजार समितीचे विद्यमान संचालक सुनील नारायण डिवरे यांची त्यांच्या स्वतःच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की सुनील घरी आले असता त्यांच्या घराच्या आवारात तीन ते चार गावगुंडानी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या तसेच त्यांच्यावर कुर्‍हाडीने देखील वार करण्यात आला आहे. या गोळीबारात पिडीत व्यक्तीचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते तसेच ते भांबरजा गावाचे माजी सरपंच तसेच ते यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. सुनील यांची पत्नी अनुप्रिया विद्यमान सरपंच म्हणून कार्य करीत आहेत.

सुनील आपले काम करून घरी परतले असता त्यांच्यावर तीन ते चार गाव गुंडांनी दोन गोळ्या झाडल्या असून त्यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आला या हल्ल्यात सुनील रक्तबंबाळ झाले याच अवस्थेत त्यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सुनील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले. सुनील शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने तसेच गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असल्याने यासोबतच विद्यमान बाजार समिती संचालक असल्याने रुग्णालयात शिवसैनिकांची गर्दीची एकच झुंबड उडाली.

रुग्णालयात अधिक गर्दी झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. या हल्ल्याबाबत प्राथमिक माहिती अशी समोर आली की, तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या एका वादाच्या बदल्यात सुनील यांच्यावर हल्ला केला गेला. पोलीस याबाबत सखोल चौकशी करीत आहेत. संदर्भ मराठी पेपर

English Summary: Former sarpanch killed in yavatmal
Published on: 04 February 2022, 04:15 IST