राज्यात ठिकठिकाणी वीज वितरणा विरोधात विविध आंदोलने सुरु आहेत. ऐन पिके भरात असताना वातावरणातील बदलाने पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र असे असताना महावितरण कार्यालयाने वीज थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. तसेच याबाबत सोलापूर जिल्ह्यात देखील माजी आमदार दिलीप माने यांच्याकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढत ते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले.
तसेच कोणाशीही कोणता वाद न घालता केवळ वीज सुरु करावी अशी मागणी त्यांनी केली. शिवाय जोपर्यंत वीज जोडणी पुन्हा केल्या जाणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातून न उठण्याची भूमिका त्यांनी घेतली. यावेळी सभापती रजनी भडकुंबे, लता जावीर यांनी आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची जोडणी करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा महावितरण दुर्लक्ष करत आहे. यामुळे अनेक शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन असेच सुरु राहील असाही इशारा त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला. ऐन पिके भरात असताना वातावरणातील बदलाने पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र असे असताना महावितरण कार्यालयाने वीज थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने शेतकरी करत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यामुळे आता शेतकरी नेते आणि विरोधी पक्षनेते देखील आक्रमक झाले आहेत. विधानसभेत देखील याचे पडसात उमटत असून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला जाब विचारला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यात पिके जळू लागली आहेत. यामुळे सरकार आता तरी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: 08 March 2022, 04:23 IST