News

सध्या सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटोबरोबरच काही भाज्यांचे दरही झपाट्याने वाढले आहेत. कडक उष्मा, कमी उत्पादन आणि उशीर झालेला पाऊस यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव आता १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाहीत.

Updated on 27 June, 2023 4:45 PM IST

सध्या सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटोबरोबरच काही भाज्यांचे दरही झपाट्याने वाढले आहेत. कडक उष्मा, कमी उत्पादन आणि उशीर झालेला पाऊस यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव आता १२० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाहीत.

मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ३ रुपये किलो आणि किरकोळ बाजारात १० ते २० रुपये किलो होते. मात्र जूनमध्ये त्यात अचानक वाढ झाली आहे.

हे दर आता १०० रुपयांच्या वर झाले. लवकर पाऊस न पडल्याने हा परिणाम झाला आहे. टोमॅटोचे भाव गेल्या आठवड्यात तिपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होत आहे.

शेतकऱ्यांनो जमिनीची सुपीकता कशी वाढवावी?, जाणून घ्या...

नुकत्याच झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी तारांच्या आधारे झाडे उभारत आहेत. टोमॅटो घेण्यासाठी दिल्लीचे व्यापारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी बोलत आहेत.

भारतात एखादी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकते? कुटुंब मोठे असल्यास मर्यादा वाढते का? जाणून घ्या नियम

महाराष्ट्रात देखील असेही जवळपास दर आहेत. भविष्यातही भाव चढेच राहतील, अशी शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पीक आल्यावर भाव खाली येण्याची अपेक्षा आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे टॉमेटो आहे त्यांची मात्र दिवाळी सुरू आहे.

आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा, अखेर सरकारने काढला आदेश..
तोतापूरी जातीच्या बकऱ्याला ८ लाखांची बोली, बकरी ईदमुळे मोठ्या प्रमाणात दर वाढले...
शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, एकरी १० हजार रुपये, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत, केसीआर यांनी राज्यात रणशिंग फुंकले

English Summary: Forget eating tomatoes for a few days! Now tomatoes at Rs 120 per kg, the result of prolonged rains..
Published on: 27 June 2023, 04:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)