News

शेतातील पिके तीन ते चार दिवस सलग पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे 30 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे या नुकसानीचे पंचनामे यंत्रणा कधी करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी याचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी दिली.

Updated on 21 July, 2022 10:59 AM IST

मागच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असताना मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आता गेल्या २४ तासांत या भागातील पावसाचा जोर (Heavy Rain In Akola) ओसरला आहे. पाऊस नसल्याने नदी-नाल्यांचे पूरही (Akola Flood) कमी झाले आहेत. पाऊस व पुराच्या पाण्यामुळे मात्र नुकसान (Crop Damage) प्रचंड झाले आहे.

शेतातील पिके तीन ते चार दिवस सलग पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे 30 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे या नुकसानीचे पंचनामे यंत्रणा कधी करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी याचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी दिली.

यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वच नदी-नाल्यांना पूर आले. प्रामुख्याने पूर्णा नदीला व तिच्या उपनद्यांना पूर आले. आता पूरपरिस्थिती ओसरली असली तरी पुराच्या पाण्याने नदी-नाल्यांच्या काठावरील शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरिपात लागवड केलेली पिके वाहून गेली आहेत.

ब्रेकिंग! रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती

सोयाबीन, तुरीचे पीक नामशेष झाले. सदानंद भदे यांचे चार ते पाच एकरांतील पीक नाल्याच्या पाण्याने खरडून नेले. खारपाण पट्ट्यात या सलग पावसाने मोठे नुकसान केले आहे. यामुळे आता शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. सध्या मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, यामुळे याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन दिवसांत पाऊस, पुराने हाहाकार उडवला. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले.

महत्वाच्या बातम्या;
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मोठी बातमी! ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले, निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश
आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...

English Summary: force rain subsided, attention farmers panchanama losses
Published on: 21 July 2022, 10:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)