News

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी खरीप हंगामात अनेक पिके घेतात त्यामध्ये बाजरी, सूर्यफूल,चवळी आणि सोयाबीन ही अनेक प्रकारची पिके घेतात. प्रत्येक वर्षी खरिप पिकांना फारसा दर मिळत न्हवता त्यामुळं खरीप हंगामात शेतकरी नेहमी अडचणीत असायचा.परंतु ह्या खरीप शेतकरी वर्गाला सोयाबीन पिकात चांगलाच फायदा मिळाला आहे. यंदाच्या साली सोयाबीन ला उच्चांकी भाव मिळाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढा भाव सोयाबीनला मिळाला आहे

Updated on 25 June, 2021 3:03 PM IST

सोयाबीन उत्पादन करणारा शेतकरी समाधानी :

प्रत्येक वर्षी शेतकरी दुबार पेरणी, अवकाळी पाऊस, कीड यामुळे त्रस्त होत आहे पण या वर्षी सोयाबीनने शेतकऱ्यांना सुखाचे आणि आनंदाचे दिवस लावले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना या पिकात मोठाच फायदा मिळणार आहे.यंदाच्या वर्षी सोयाबीन ला 9 हजार 500 रुपये एवढा दर मिळाला आहे.यामुळं सोयाबीन उत्पादन करणारा शेतकरी समाधानी आणि आनंदी आहे.महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्रापैकी 80 टक्के शेती ही सोयाबीन ची केली जाते.

हेही वाचा:पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करावी – दादाजी भुसे

पहिल्यांदा सोयाबीन ला पाहिजे तसा योग्य भाव मिळत न्हवता. मात्र या वर्षी सोयाबीन ला चांगलाच भाव मिळाला आहे. प्रति क्विंटल सोयाबीन ला भाव हा 9 हजार 500 रुपये एवढा मिळाला आहे.महाराष्ट्र मधील वाशीम जिल्हा हा सोयाबीन ची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वाशीम ची ओळख आहे. सोयाबीन चा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र यंदाच्या वर्षी सोयाबीन ने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणले आहेत.

या साली सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. सोयाबीन चा प्रति  क्विंटल दर 9500 च्या वर गेले आहेत. हे दर आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च पातळीर पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो आहे. आता फक्त शेतकरी एकच इच्छा व्यक्त करतोय की हर समय दीर्घकाळ सोयाबीन ला चांगला भाव मिळाला पाहिजे.

English Summary: For the first time in history, soybeans have 'good days', high rates
Published on: 25 June 2021, 03:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)