News

बाजारपेठेत कापसाला अचानक मोठी मागणी वाढली. यामुळे कापसाच्या दारात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरापासून कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेला आहे. दोन दिवसांपासून कापूस दहा हजार 400 ते दहा हजार 500 रुपये प्रति क्विंटलने विकू लागला आहे.

Updated on 14 January, 2022 5:26 PM IST

यवतमाळ : बाजारपेठेत कापसाला अचानक मोठी मागणी वाढली. यामुळे कापसाच्या दारात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरापासून कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेला आहे. दोन दिवसांपासून कापूस दहा हजार 400 ते दहा हजार 500 रुपये प्रति क्विंटलने विकू लागला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आठवडा ऐतिहासिक ठरत आहे. कापसाची कमी उपलब्धता आणि बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला.

कापसाला मागणी वाढली

यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या ४४० पार झाला. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला आहे. यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर १० हजारांच्या ४४० पार झाला. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला.


कापसाची आवक वाढली

जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर, खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत. जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

हमीभावापेक्षा जास्त मिळतोय दर

कापसाचा हमीदर ६ हजार २५ रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर १० हजार ४०० रुपये आहेत. जिल्ह्याती ३५ ते ४० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ११ लाख लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. त्यातच मागणी वाढल्याने दराने उसळी घेतली. दोन दिवसात कापसाच्या भावात चढ उतार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात चिंतेत सापडले आहे.

English Summary: For the first time in 50 years, the price of 'white gold' is 10,000 per quintal
Published on: 12 January 2022, 06:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)