पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळद लागवड मोठ्या प्रमाणातकेली जाते. हळदीचे क्षेत्र आता महाराष्ट्राच्या इतर भागात देखील वाढू लागली आहे. परंतु बऱ्याच समस्या हळद लागवडी मध्ये आहेत.त्यामुळे बरेच शेतकरी अजूनही हळद लागवडीसाठी हवे तेवढ्या प्रमाणात पुढे येत नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्रातील हळद पिकाची लागवड, हळद प्रक्रिया कशी हळद निर्यातीच्या मध्येच या काही समस्या आहेत. या समस्यांचा अभ्यास करून एक नवीन परिपूर्ण धोरण आखण्यासाठीखासदार हेमंत पाटील,आमदार अमित झनक, आमदार महेश शिंदे व अन्य 20 सदस्य यांचा समावेश असलेली समिती गठित केली होती.या समितीने 19 सूचना असलेला एक मसुदा बुधवारी कृषी विभागाकडे सुपूर्द केला.या बाबतीमध्ये शेतकरी तसेच संशोधक,निर्यातदार व ग्राहकांच्या अपेक्षा व सूचना मागविण्यात येणार आहेत.आणि संबंधित प्रक्रिया दोन आठवडे चालणार असून याबाबतचा अंतिम अहवाल तयार करून निर्णयासाठी राज्याच्या मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. जर हळद लागवड मध्ये विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये जवळजवळ 17 हजार हेक्टरवर हळद लागवड होते.
विदर्भामध्ये सेलम,कृष्णा,राजापुरी, स्वरूपा इत्यादी तसेच वायगाव हळद इत्यादी वाणांची लागवड केली जाते.अकोलायेथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात हळदीवर सध्या संशोधन सुरू आहे.
करण्यात आलेल्या काही सूचना
- कीडविरहित बियाणे तसेच पुनरूत्पादन करून कुरकुमीन निर्मिती पर्याय
- तसेच गावानुसार माती व पाणी परीक्षण
- स्वस्त यंत्रसामग्री व अवजारे देणे
- शेतकरी कंपनी व बचत गटांना सुविधा केंद्र
- ब्रॅण्डिंग पॅकेजिंग,वितरण,खरेदीदार, विक्रेते मेळावे घेणे तसेच निर्यातक्षम हळद क्षेत्र नोंदीसाठी जागृती व हळदीच्या आंतरपीक म्हणून समावेश, हळद महोत्सव व पीक विमा योजनेत हळदीचा समावेश करावा इत्यादी सूचनाचा या मसुद्यात समावेश आहे.
Published on: 23 February 2022, 04:34 IST