यावर्षी पंजाबराव डख पाटील यांनी वर्तवलेला हवामानाचा अंदाज चुकीचा ठरला असे घडलेच नाही. त्यांनी सांगितलेले अंदाज अचूक ठरले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात झाला. त्यांच्या अंदाजामुळे शेतकरी सतर्क राहिले व संभाव्य नुकसान टाळता आले.
आता दिवाळीच्या काळात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. परंतु आत्ता जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. 8 नोव्हेंबर पासून हवामान कोरडे राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.
खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे रब्बीचा हंगाम हा तब्बल एका महिन्यानी लांबणीवर पडला आहे.
शिवाय दिवाळी मध्ये पाऊस पडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. परंतु काल पासून हवामान एक कोरडे राहणार असून वाफसा झालेल्या शेतात पेरणी करण्याची हीच चांगली वेळ असल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.त्यांनी दिलेला अंधाराचा फायदा मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.
पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला
आठ नोव्हेंबर पासून कोरडे वातावरण राहणार आहे.त्यामुळे रखडलेल्या मागण्यांसाठी हे योग्य वातावरण आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत असेच कोरडे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवतापेरण्यांची कामे सुरू करणे आवश्यक आहे.
सोमवारपासून पाच दिवस वातावरण कोरडे राहणार आहे मात्र त्यानंतर पुन्हा चक्रीवादळाचा धोका कायम आहे.या वर्षी प्रत्येक दहा ते पंधरा दिवसांनी चक्रीवादळाचा धोका राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत कामे उरकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करूचनये.
दरवर्षी शेतकरी पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात करतात. मात्र यावर्षी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी लागणार आहे. रासायनिक खतांची मिसळण किंवा जैविक पद्धतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे. यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो.त्याशिवाय या वर्षी जास्त पाऊस झाल्याने जमिनीत पाणी आहे.
त्यामुळे बुरशीचे प्रमाणही जास्त असणार आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे.
मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहणार असून थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. झालेला अवकाळी पाऊस आणि चिभडलेली शेतजमीन यामुळे शेतकरी पोषक वातावरणाची वाट पाहत होते. अखेर आता पेरणीसाठी पोषक वातावरण झाले असून पेरणीचा टक्का वाढेल अशी अपेक्षा कृषी विभाग बाळगत आहे. हरभरा आणि गहू पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या थंडीतही वाढ होणार असल्यामुळे या आठवड्यात वेगळेच चित्र निर्माण होईल असा अंदाज आहे. ( संदर्भ- कृषी क्रांती
Published on: 09 November 2021, 09:16 IST