News

मुंबई- बदलती जीवनशैली व प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या मागणीमुळे कृषी उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. नावीण्यपूर्ण कल्पना आणि उद्योगातील भागीदारी याची आवश्यकता आहे. खासगी कृषि उद्योग हा शेतमालाच्या विक्रीसाठीचा पहिले केंद्र असून या क्षेत्राची वाढ ही प्रामुख्याने खासगी उपक्रमावर अवलंबून आहे.

Updated on 25 September, 2021 11:32 AM IST

मुंबई- बदलती जीवनशैली व प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या मागणीमुळे कृषी उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.  नावीण्यपूर्ण कल्पना आणि उद्योगातील भागीदारी याची आवश्यकता आहे. खासगी कृषि उद्योग हा शेतमालाच्या विक्रीसाठीचा पहिले केंद्र असून या क्षेत्राची वाढ ही प्रामुख्याने खासगी उपक्रमावर अवलंबून आहे.

कृषी उद्योगांना भरीव स्वरुपाचे अर्थसहाय्य सरकार मार्फत केले जाते. छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाच्या वित्तीय सहभागातून देशात कृषि उद्योग विकासास चालना देण्यासाठी कृषि उद्योग सुरु करण्यासाठी सहाय्य करणे. कर्ज प्रस्तावासाठी प्रकल्प अहवाल निर्मितीस अर्थसहाय्य या योजनेतून केले जाते.

योजनेची ठळक वैशिष्टये:

 

कृषि उद्योगास मुदत कर्ज मंजूर करणा-या बँकाकडून प्रकल्प उद्योजकास  उपलब्ध होणा-या वित्तीय पुरवठयामधील तफावत दूर करण्यासाठी बिनव्याजी भांडवल पुरवठा करणे हे या योजनेचे ठळक वैशिष्टये आहे.

योजनेअंतर्गत पात्र प्रकल्प, पात्र व्यक्ती आणि पात्र वित्तीय संस्थाकृषि पूरक क्षेत्रातील किंवा कृषि सेवांशी संबंधित प्रकल्प ज्याच्या उत्पादनास हमखास बाजारपेठ आहे. तसेच शेतक-यांना विविध उच्च मूल्यांकीत पिके आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देणारे प्रस्तावित प्रकल्प आणि बँकेने मुदत कर्ज मंजूर करण्यासाठी  स्विकारलेले प्रकल्प हे या योजने अतंर्गत सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

या योजनेअंतर्गत व्यापारक्षम कृषि प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी खाजगी व्यक्ति, शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी/मालकीचे उद्योग, स्वयंसहाय्यता गट, कंपनी, कृषि उद्योजक, कृषि निर्यात क्षेत्रातील उद्योग,व्यक्तीगत कृषि पदवीधर अथवा कृषि पदवीधरांच्या गटास सहाय्य देण्यात येते.

योजने अंतर्गत कर्ज मर्यादा:

या योजनेमध्ये मिळणारे अर्थसहाय्य हे प्रकल्प खर्चावर अवलंबून असून बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पामधील बँकांची कर्जाची रक्कम वगळता उद्योजकांनी स्वत: केलेल्या गुंतवणूकीच्या 26 टक्के एवढी रक्कम तसेच शेतकरी उत्पादक कंपनीने (FPC) पुरस्कृत केलेल्या कृषि उद्योंगास त्यांच्या स्वगुंतवणूकीच्या किमान 40 टक्के आहे. या  योजनेअंतर्गत अधिकतम अर्थ सहाय्याची मर्यादा ही रु.50.00 लाख पर्यंतच आहे.

 

प्रस्तावित कृषि प्रकल्पाची किंमत ही किमान रु.15.00 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त व कमाल मर्यादा रु.500 लक्ष इतकी असावी. तथापि, नियोजन आयोगाने प्रस्तावति केलेल्या अनुसूचित म्हणून मागास जिल्हयांमध्ये प्रकल्प किंमत रु.10.00 लक्ष आणि त्यावरील असेल. प्रकल्पास जास्त बिनव्याजी भांडवली कर्ज देण्याबाबत छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाच्या कार्यकारी समितीला अधिकार राहतील. लाभार्थी यांनी सविस्तर अहवाल बँकांना सादर करणे आवश्यक आहे.

सविस्तर प्रकल्प अहवाल मिळाल्यानंतर बँका त्याचे मूल्यमापन करुन आवश्यक मुदत कर्ज लाभार्थ्यास मंजूर करतात.

 

English Summary: for krushi industries give without intrest loan
Published on: 25 September 2021, 11:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)