भारतीय अन्न महामंडळाने इथेनॉल उत्पादनासाठी चालू वर्षात तांदळाच्या साठ्यात तब्बल 466 टक्क्यांची वाढ केली असून डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी एफसीआय ने तांदळाचा साठा राखून ठेवला आहे
इथेनॉल उत्पादन करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या बफर स्टॉक मधूनवळवलेल्या अन्नधान्य बाबत विचारलेल्या एका प्रश्नावर केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत उत्तर दिले. 2020-21 या इथेनॉल पुरवठा वर्षात इथेनॉल च्या उत्पादन करण्यासाठी सरकारने 20 रुपये प्रति किलो दराने 81 हजार 44 टन तांदळाचा साठा आसवनी प्रकल्पांसाठी राखून ठेवला होता.या साठ यापैकी आसवनी प्रकल्पांनी 49 हजार 233 टन तांदूळ यासाठी उचलला होता. चालू पुरवठा वर्ष यामध्ये सरकारने वीस रुपये प्रति किलो दराने चार लाख 58 हजार 817 टनतांदळाचा साठा राखून ठेवला आहे.
यापैकी 27 जानेवारी पर्यंत आसवनीप्रकल्पांनी एकोणवीस हजार 929 टन तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचलला आहे. गहू, तांदूळ, ऊस आणि इतर पिकांच्या खरेदी बाबतच्या विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले की, 2021-22 मध्ये 433.44 लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे.
याशिवाय 601.85 लाख टन तांदूळ आणि 2996 लाख टन उसाची खरेदी 2020-21 मध्ये करण्यात आली आहे.2021-22च्या रब्बी विपणन हंगामात 49.19 लाख गहू उत्पादक शेतकऱ्यांना खरेदीचा लाभ मिळाला आहे.
( संदर्भ स्त्रोत- ॲग्रोवन )
Published on: 15 February 2022, 09:50 IST