सध्या कपाशीवर सर्वात मोठे संकट असेल तर दे गुलाबी बोंड आळी चे आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात होत आहे.बोंड अळीचा प्रादुर्भाव साठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे म्हणजे कपाशीचे फरदड घेणे हे होय
चालू वर्षाचा कपाशीचे फरदड ठेवली तर त्या फरदडीचा परिणाम हा पुढील वर्षाच्या हंगामा वरून बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेण्याचे टाळावे, असे आवाहन कापूस संशोधन केंद्र नांदेड चे तज्ञ डॉ.खिजर बेग यांनी केले.
सध्या कपाशीच्या संकरित वाणाची लागवड करण्यात येते. या दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वानांवर गुलाबी बोंड आळी च्या जास्त पिढ्या पूर्ण होतात.त्यामुळे या संकरित वानांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तसेच या संकरीत वाणांची फुले आणि बोंडे येण्याचा काळा वेगळा असल्यामुळे गुलाबी बोंड आळी ला कायमस्वरूपी अन्न पुरवठा होत असतो.
त्यामुळे गुलाबी बोंड आळी चा जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते. तसेच जिनिंग-प्रेसिंग मिल मध्ये जास्त काळापर्यंत कच्चा कपाशीची साठवण केली जाते. त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंड आळी येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कपाशी लागवड केली तर अशी लागवड केलेल्या कपाशीमध्ये फुले येण्याचा कालावधी हा जून किंवा जुलै महिना असतो.
त्यामुळे लवकर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव होतो. प्रामुख्याने आक्टोबर च्या शेवटी किंवा नोव्हेंबर मध्ये गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव जाणवतो. शेळी कपाशीच्या वाळलेल्या खुरकुटेमध्ये कोषावस्थेत जाते. त्यातच नोव्हेंबर मध्ये शेतात पाणी देऊन जर पीक ठेवले तर शेंद्रिय बोंड आळी ला वाढवण्यास पोषक वातावरण तयार होते.अशा परिस्थितीत बीटी कापसाची फरदड घेतल्यास बोंड आळी यांमध्ये बीटी प्रथिना विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते.( स्त्रोत -मराठी पेपर)
Published on: 06 December 2021, 10:19 IST