शेतीव्यवसाय मध्येसध्या यांत्रिकीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत. पिकांच्या लागवडीच्याअगोदर पासून तर थेट काढणीपर्यंत विविध कामांसाठी यंत्राचा वापर होऊ लागला आहे. यंत्राच्या वापरामुळे कामात अचूकता, कमी वेळेत जास्त काम या बाबी शक्य झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून पिकांवरील किडी च्या नियंत्रणासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
यासंबंधीची नियमावली केंद्र सरकारने मागे चूक लागू केली होती परंतु आता ड्रोनच्या वापराचे प्रत्यक्ष वेळ आली असून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात दोन हाताळणी विषयी चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण जानेवारी महिन्यापासून दिले जाईल.
शेती क्षेत्राशी संबंधित असलेल्या तरुणांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने उस्मानाबाद येथे एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच शेतीमध्ये ड्रोनचे तंत्रज्ञान हे कितपत फायदेशीर आहे हे देखील शेतकऱ्यांना सांगितले जाणार आहे. ड्रोनच्या वापराबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना केले असून ड्रोनचा वापर याला परवानगी दिली आहे.
कीड नियंत्रणात ड्रोनचा फायदा
पिकांवरील सुरुवातीच्या अवस्थेत असणारी कीड सूक्ष्म असते. त्यामुळे ती डोळ्यांना असल्याने दिसत नाही. परंतु रोडला असलेल्या हाय-डेफिनेशन कॅमेऱ्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव लक्षात लवकर येतो.ड्रोनच्या वापरामुळे किडींवर आळा घालण्यासाठी योग्य औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करता येणे सहज शक्य होणार आहे त्यामुळे कमी वेळात आणि कमी खर्चात औषध फवारणी होणार आहे.
ड्रोनच्या माध्यमातून कीटक नाशक औषधांची फवारणी करताना पिकांचे संगोपन व्यवस्थित केले जाईल तसेच काही दुष्परिणाम होणार नाहीत या अनुषंगाने कृषी मंत्रालयाने विशेष प्रकारची काळजी घेतली आहे. यामध्ये पीक फवारणी क्षेत्र, असलेल्या वजनाची मर्यादा, नोंदणी तसेच सुरक्षा विमा फ्लाय क्लिअरन्स वगैरेचे नियमावली तयार करण्यात आली आहे.ड्रोन उडवणे अगोदर आणि खाली उतरल्यानंतर काय काळजी घ्यायची याबद्दल देखील नियमावली ठरवून देण्यात आले आहे.
Published on: 22 December 2021, 04:52 IST