कृषी पर्यटन हा सध्या कृषी क्षेत्रा मधील एक बदल घडवून आणत असलेल्या व्यवसाय आहे. बरेच शेतकरी आता कृषी पर्यटनाकडे वळत आहेत.या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे भर पडू शकते.या कृषी पर्यटन व्यवसायाचा फायदाजास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शासन स्तरावर देखील बऱ्याच प्रकारचे प्रयत्न केले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई- राठोड यांनी पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कळवले आहे की, कृषी पर्यटन केंद्रासाठी नोंदणीला सुरुवात झाली असून ज्या इच्छुकांना नोंदणी करायची असेल त्यासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.comया संकेत स्थळावर अर्ज उपलब्ध आहे.
कृषी पर्यटनासाठी नोंदणी करायचे असेल तर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी पाच वर्षाचे अडीच हजार रुपये शुल्क लागेल.
कृषी पर्यटन नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे…
- सातबाराउतारा
- आठ अ उतारा
आधार व पॅन कार्ड
- विज बिल
- अडीच हजार रुपये नोंदणी शुल्क भरून त्या चलनाची प्रत
- अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना
कृषी पर्यटन धोरण नोंदणीचे फायदे
शेती संबंधी विविध योजनांचा लाभ घेता येईल जसे की शेततळे योजना करता प्राधान्य, ग्रीन हाऊस, फळबाग,भाजीपाला लागवड सारख्या योजनांचा लाभ घेता येतील तसेच घरगुती गॅस जोडणी वापरता येईल.
नोंदणीसाठी अधिक माहिती करिता संपर्क पत्ता…
पर्यटन संचालनालय,उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार,गोल्फ क्लब मैदान, नाशिक,
संकेतस्थळ-www.maharashtratourism.gov.in असा आहे.
Published on: 17 December 2021, 01:26 IST