News

देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि खरिप दुप्पट करण्याचे ध्येयाला मिशन मोड्मध्ये आणले पाहिजे,. प्रत्येक राज्यांनी ते ध्येय पुर्ण केले पाहिजे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे. खरीप पिकांवरील राष्ट्रीय परिषद २०२० मध्ये तोमर बोलत होते.

Updated on 17 April, 2020 11:48 AM IST


देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि खरिप दुप्पट करण्याचे ध्येयाला मिशन मोड्मध्ये आणले पाहिजे. प्रत्येक राज्यांनी ते ध्येय पुर्ण केले पाहिजे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे. खरीप पिकांवरील राष्ट्रीय परिषद २०२० मध्ये तोमर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सर्व राज्यांना शाश्वती दिली की, राज्यांना येणारी प्रत्येक अडचणी भारत सरकार दूर करेल.  दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विविध बाबींवर चर्चा करणे, खरीप मशागती बाबत राज्यांशी सल्ला मसलत करणे हे या परिषदेचे उदिद्ष्टे होते.

कृषी क्षेत्राने या कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना धैर्याने करत आपली चोख कामगिरी पार पाडावी, असेही तोमर यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाव, गरीब, आणि शेतकऱ्यांना या परिस्थितीचा त्रास होणार नसल्याची शाश्वती दिली आहे.  राज्यांनी पीएम पीक विमा आणि भूमी आरोग्य कार्ड योजनाविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही तोमर म्हणालेत.  कृषी बाजार मध्ये किंवा कृषी क्षेत्राला कोणताच परिणाम होऊ नये, यासाठी ऑल इंडिया अॅग्री ट्रन्सपोर्ट सेल सेंटर सुरू करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांनी ई-नाम पोर्टलचा उपयोग करावा.  केंद्रीय गृहमंत्रालयाने ठरवलेले नियमांचे पालन करण्यात यावे, सोशल डिस्टन्सिंगचे  भान ठेवावे, असेही आवाहन कृषी मंत्र्यांनी केले

सन २०२०-२१ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी २९८.० दशलक्ष टन निश्चित केले आहे. आर्थिक वर्ष २०१९- २० मधील अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य २९१.१० दक्षलक्ष टन होते.  याच्या तुलनेत यंदाचे उत्पादन हे २९२ दक्षलक्ष टन राहिल हे अपेक्षित आहे.  कृषी राज्यमंत्री परशोत्तम रुपाला नॅशनल कॉन्फरन्समध्ये बोलतान म्हणाले की, शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे फायदे समजवून सांगितले पाहिजे. बऱ्याच राज्यांमधील आर्थिक विकासासाठी कृषी आणि फलोत्पादन क्षेत्र हे महत्त्वाचे घटक बनले आहे.  गेल्या वर्षी (२०१८-१९) अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होण्याबरोबरच २५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रातून सुमारे ३१३.८५ दशलक्ष मेट्रिक टन बागायती फलोत्पादन उत्पादन झाले आहे.  हे जगाच्या एकूण उत्पादनापैकी १३ टक्के आहे.  चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा भाजीपाला उत्पादक देश असल्याचे त्यांनी सांगितले.

English Summary: Food Grains Production target for FY 2020-21 Fixed at 298.0 Million Tonnes
Published on: 17 April 2020, 11:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)