News

मुंबई: आरोग्यपूर्ण जीवनशैलीत आहार हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित आहार आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता याविषयी जागरुकता विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने शालेय मुलांसाठी पोषक, पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न कसे देता येईल या उद्देशाने विशेष कार्यक्रम तयार केला आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

Updated on 01 June, 2019 7:51 AM IST


मुंबई:
आरोग्यपूर्ण जीवनशैलीत आहार हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित आहार आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता याविषयी जागरुकता विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने शालेय मुलांसाठी पोषक, पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न कसे देता येईल या उद्देशाने विशेष कार्यक्रम तयार केला आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालय, दिल्ली येथे रिट पिटीशन क्रमांक 8567/2010 मध्ये दिलेल्या मार्गदर्शनपर आदेशानुसार भारतातील सर्व शाळांमधील मुलांना परिपूर्ण आणि पोषक आहार तसेच अन्न सुरक्षितता, स्वच्छता याबाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, दिल्ली यांनी Guidelines for Making Available Wholesome and Nutritious Food to School Children तयार केल्या आहेत. त्याबाबतची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाळा व कॉलेज तसेच मुलांचे पालक यांना School & College Food Project पूर्णत्वास नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ज्या अन्न पदार्थांमध्ये मेद, मीठ व साखर जास्त प्रमाणात असते अशा अन्न पदार्थांनाHFSS (High Fat, Sodium & Sugar) अन्न पदार्थ म्हणतात. जास्त साखर खाल्ल्याने स्थूलपणा, मधुमेह इ. आजार बळावतात. मुलामुलींचे वजन वाढणे (लठ्ठपणा) व अति मीठ सेवनाने हा आजार बळावतो. HFSS (High Fat, Sodium & Sugar) घटक पदार्थ असलेले अन्न पदार्थांचे बाजारात आकर्षक जाहिरातींद्वारे सहजपणे कमी किंमतीत पॅकिंगमध्ये उपलब्ध होत असल्याने मुलांमुलीमधील खाण्याच्या सवयी बदलत आहेत. त्यामुळे कर्बोदके/प्रथिने व इतर आवश्यक घटक पदार्थ जे नैसर्गिकरित्या (फळे/भाजीपाला) व घरी बनविलेले ताजे अन्न पदार्थ मुलामुलींना मिळत होते त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांमध्ये करण्यासाठी शासनाने दिनांक 3 मे 2019 रोजी मंजुरी दिलेली आहे.

अभ्यासाबरोबरच मुलांना परिपूर्ण आहार मिळणे आवश्यक असल्याने खालील संदेश दिला आहे.

बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, आईसक्रीम, फ्राईज इ.

थोडक्यात खा

Stringently

खाद्यतेल, फॅट, मिट, फिश, अंडी इ.

साधारणपणे खा

Moderately

फळे, भाज्या

जास्त प्रमाणात खा

Liberally

कडधान्ये, तृणधान्ये, दूध

नियमित पुरेशा प्रमाणात खा

Consume Adequately


असा संदेश दिला जाणार असून त्याप्रमाणे शाळांच्या उपाहारगृहामधून पुरविल्या जाणाऱ्या/विक्री केल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा व लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लठ्ठपणा (Obesity) कमी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात राबविला जात आहे.

English Summary: Food and Drug Administration Guidelines
Published on: 01 June 2019, 07:46 IST