News

नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्या मधील शेतकऱ्यांसाठी 21 ते 27 सप्टेंबर दरम्यानकृषिमाल निर्यात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Updated on 21 September, 2021 10:36 AM IST

 नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्या मधील शेतकऱ्यांसाठी 21 ते 27 सप्टेंबर दरम्यानकृषिमाल निर्यात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

.या माध्यमातून शेतकऱ्यांनी याकृषिमाल निर्यात सप्ताहात सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 या कृषिमाल निर्यात सप्ताहामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे मिळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

.कृषी माल निर्यात सप्ताहामध्ये शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतमालाची निर्यातीसाठी निर्यातक्षम शेतमालाचे शेत नोंदणी करण्यासाठी अर्ज भरून घेणे, लेबल क्‍लेम,कीटकनाशकांच्या वापराबाबत प्रचार करणे आणि प्रसिद्धी करणे, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या शेतमाल निर्यात करू इच्छित असतील त्या कंपन्यांना मार्गदर्शन करणे निर्यातीसाठी च्या विविध प्रकारच्या योजना आहेत त्यांची माहिती इच्छुक निर्यातदारांना देणे अशा पद्धतीचे मार्गदर्शनव शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणारआहे.

 

या सप्ताहामध्ये विड्याची पाने मळे, बोर( अदर फ्रुट क्रॉप नेट ),कांदा यासाठी जास्तीत जास्त शेतकर्‍यांची नोंदणी करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

English Summary: foer nashik district farmer start from today import week
Published on: 21 September 2021, 10:36 IST